मुंबई, 13 ऑगस्ट: ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक (Gold in Tokyo Olympic 2020) मिळणं हा संपूर्ण भारतीयांसाठी एक आनंदाचा क्षण होता. भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने धमाकेदार कामगिरी करत भारतासाठी गोल्ड जिंकलं. यानंतर सोशल मीडियावर त्याचं कौतुक करणारे अनेक मेसेज व्हायरल झाले आहेत, अनेकांनी त्याच्यासाठी बक्षीसही जाहीर केली आहे. दरम्यान सोशल मीडियावर असाही दावा केला जात आहे की, नीरज चोप्राने गोल्ड मेडल जिंकण्याच्या खुशीमध्ये भारत सरकारने सर्व लहान मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी 2399 रुपयांचा 12 महिन्यांचा रिचार्ज मोफत देण्याचं आश्वासन दिलं आहे. या मेसेजमध्ये एका लिंकवर क्लिक करण्याचंही सांगण्यात आलं आहे. तुम्हाला देखील असा कोणता मेसेज आला आहे का? किंवा अशा कोणत्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं असेल तर सावधान!
हे वाचा-तुमच्याकडेही आहे PF खातं? एका तासात मिळतील 1 लाख रुपये, वाचा कसं कराल अप्लाय
दरम्यान या दाव्याची पडताळणी केंद्रीय संस्था असणाऱ्या पीआयबीने केली. पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) च्या टीमने या दाव्याची पडताळणी करून हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे.
काय आहे पीआयबीचं ट्वीट?
पीआयबी फॅक्टचे ने असं म्हटलं आहे की, '#Olympics2021 मध्ये सुवर्णपदक मिळण्याच्या खुशीत भारत सरकार 12 महिन्यांचा रिचार्ज फ्री देत आहे, असा दावा खोटा आहे. भारत सरकारने फ्री रिचार्ज संदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. कृपया अशा कोणत्याही बनावट लिंकवर तुमची खासगी माहिती शेअर करू नका.'
दावा: #Olympics2021 में स्वर्ण पदक मिलने की खुशी में भारत सरकार सभी को 12 महीने फ्री रिचार्ज का अवसर दे रही है#PIBFactCheck
▶️ यह दावा फर्जी है। ▶️भारत सरकार ने फ्री रिचार्ज के बारे में ऐसी कोई घोषणा नहीं की है। ▶️कृपया ऐसे किसी भी फर्जी लिंक पर अपनी निजी जानकारी साझा न करे। pic.twitter.com/a9KDFX00uV — PIB Fact Check (@PIBFactCheck) August 13, 2021
या बनावट दाव्यामध्ये असं देखील म्हटलं आहे की ही ऑफर केवळ 15 ऑगस्टपर्यंत उपलब्ध आहे. दरम्यान तुम्हाला असा कोणता मेसेज आला असेल तर त्यातील लिंकवर क्लिक करू नका, शिवाय कोणतीही वैयक्तिक माहिती अशा लिंकवर शेअर करू नका.
हे वाचा-PIN, CVV, OTP यासारखा तपशील कुणाबरोबरही शेअर करू नका! RBI ने जारी केला अलर्ट
तुम्हीही करू शकता फॅक्टचेक
जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना किंवा धोरणांबाबतच्या सत्यतेबद्दल संशय असल्यास, तुम्ही पीआयबी फॅक्ट चेककडे ते पाठवू शकता. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच मेलद्वारेही पीआयबी फॅक्ट चेकशी संपर्क करू शकता. व्हॉट्सअपवर 8799711259 या क्रमांकावर संपर्क करता येईल. त्याशिवाय ट्वीटर @PIBFactCheck, फेसबुकवर PIBFactCheck आणि pibfactcheck@gmail.com ईमेलद्वारे संपर्क करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.