नवी दिल्ली, 13 ऑगस्ट: कोरोना काळात (Coronavirus) एकीकडे ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत, तर त्याचबरोबर ऑनलाइन फ्रॉडमध्ये देखील वाढ होते आहे. ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी या फसवणूक करणााऱ्यांकडून विविध क्लुप्त्या केल्या जातात, अशावेळी तुम्ही सावध राहणं आवश्यक आहे. तुमची बँकिंग संबंधित कोणतीही माहिती कुणासोबतही शेअर करू नका. आरबीआयने (Reserve Bank of India) ट्वीट करूनही याबाबत माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने टोक्यो ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा (Neeraj Chopra) चा एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबत महत्त्वाचा संदेश दिला आहे.
काय आहे आरबीआयचं ट्वीट?
ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात संदेश देणारा एक व्हिडीओ आरबीआयने पोस्ट केला आहे, ज्यामध्ये नीरज चोप्रा ग्राहकांना महत्त्वाचा संदेश देत आहे. 'आरबीआय कहता है' कॅम्पेनअंतर्गत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. केंद्रीय बँकेने असं म्हटलं आहे की तुमचा बँकिंग तपशील जसं की PIN, CVV, OTP कुणासोबतही शेअर करू नका.
.@RBI Kehta Hai.. Stay Alert! Do not share your bank details such as PIN, CVV, OTP with anybody posing as RBI or bank representatives. #BeAware #BeSecure#rbikehtahai #StaySafehttps://t.co/mKPAIp5rA3 pic.twitter.com/EJVIswssxz
— RBI Says (@RBIsays) August 12, 2021
आरबीआयकडून वेळोवेळी ग्राहकांना अशी माहिती कुणाबरोबरही शेअर न करण्याबाबत अलर्ट दिला जातो. आरबीआयचे असे म्हणणे आहे की आरबीआय कधीच लॉटरी एसएमएस किंवा ईमेल करत नाही. त्यामुळे असे मेसेज किंवा कॉल किंवा मेल आल्यास सावध राहा. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. शिवाय कोणत्याही बँका देखील तुमच्या वैयक्तिक माहितीसाठी फोन करत नाहीत. देशातील महत्त्वाच्या बँकानी देखील याबाबत अलर्ट पाठवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rbi, Rbi latest news