advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / तुमच्याकडेही आहे PF खातं? एका तासात मिळतील 1 लाख रुपये, वाचा कशाप्रकारे कराल अप्लाय

तुमच्याकडेही आहे PF खातं? एका तासात मिळतील 1 लाख रुपये, वाचा कशाप्रकारे कराल अप्लाय

जर तुम्ही नोकरदार वर्गातील आहात आणि तुमच्याकडेही पीएफ (PF Account) आहे तर तुम्ही एका तासात 1 लाखापर्यंत रक्कम काढता येईल

01
 तुम्हाला देखील पैशांची आवश्यकता असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मोदी सरकारने पीएफमधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. तुमच्याकडे जर पीएफ खाते असेल तर तुम्ही एका तासामध्ये 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम सहज काढू शकता

02
 .तुम्ही तुमच्या ईपीएफमधून (Employees Provident Fund EPF) एक लाख रुपये आगाऊ (PF Advance) काढू शकता. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मेडिकल इमरजन्सीसाठी हे पैसे काढू शकता. कोरोना काळात लोकांच्या मदतीसाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला या सेवेचा फायदा मिळवण्यासाठी खर्च दाखवावा लागेल. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला 3 ते 7 दिवसांची वाट पाहावी लागणार नाही

03
 1 जून रोजी EPFO ने सर्क्यूलर जारी करत अशी माहिती दिली आहे की कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मेडिकल अ‍ॅडव्हान्स म्हणून काढता येईल. कोरोना व्हायरससह अन्य आजारपणांसाठी इमरजन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यास पीएफमधून पैसे काढता येतील

04
 याआधीच्या सेवेनुसार मेडिकल इमरजन्सीवेळी ईपीएफमधून पैसे काढता येत होते. ही सेवा तुम्हाला मेडिकल बिल जमा केल्यानंतर मिळत असे. मात्र आता मिळणारा अ‍ॅडव्हान्स आधीच्या सेवेपेक्षा वेगळा आहे. यामध्ये तुम्हाला कोणतंही बिल जमा करायचं नाही आहे. तुम्हाला केवळ अर्ज करायचा आहे आणि पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील.

05
 कशाप्रकारे काढता येतील पैसे?- www.epfindia.gov.in वेबसाइटच्या होमपेजवर COVID-19 टॅब अंतर्गत ऑनलाइन अ‍ॅडव्हान्स क्लेम करता येईल. https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface याठिकाणी ऑनलाइन सेवांमध्ये जा >> क्लेम (फॉर्म -31,19,10 सी आणि 10 डी). त्यानंतर तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक प्रविष्ट करा आणि व्हेरिफाय करा. यानंतर तुम्हाला Proceed for Online Claim वर क्लिक करुन ड्रॉप डाऊनमधून PF Advance (Form 31) निवडावा लागेल. तुमचं कारण निवडा आणि त्यानंतर अपेक्षित रक्कम टाका. चेकची स्कॅन कॉपी अपलोड करून तुमचा पत्ता प्रविष्ट करा. Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी मिळेल, तो प्रविष्ट करा. याठिकाणी तुमचा क्लेम फाइल होईल

06
 कोरोना काळात आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्यांसाठी सरकारने ही सेवा सुरू केली आहे. तुम्हाला पैशांची अत्यंत आवश्यकता असेल तर तुम्ही या सेवेचा वापर करू शकता. मात्र तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की अधिक आवश्यकता असल्याशिवाय पीएफमधील पैसे काढू नये

  • FIRST PUBLISHED :
  •  तुम्हाला देखील पैशांची आवश्यकता असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मोदी सरकारने पीएफमधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. तुमच्याकडे जर पीएफ खाते असेल तर तुम्ही एका तासामध्ये 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम सहज काढू शकता

    MORE
    GALLERIES