जास्त फोनबिल भरण्यासाठी तयार राहा! कॉल आणि इंटरनेटचे दर लवकरच वाढण्याची शक्यता

जास्त फोनबिल भरण्यासाठी तयार राहा! कॉल आणि इंटरनेटचे दर लवकरच वाढण्याची शक्यता

दूरसंचार क्षेत्रातील (Telecom Sector) सध्याची संरचना लाभदायक नसल्या कारणाने पुढील एक ते दीड वर्षामध्ये फोन कॉल आणि इंटरनेटसह सर्व सेंवा-सुविधांचे दर दोन वेळा वाढवले जाऊ शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 जुलै : दूरसंचार क्षेत्रातील (Telecom Sector) सध्याची संरचना लाभदायक नसल्या कारणाने पुढील एक ते दीड वर्षामध्ये फोन कॉल आणि इंटरनेट (Phone Calls and Interned Bills)सह सर्व सेंवा-सुविधांचे दर दोन वेळा वाढवले जाऊ शकतात. EY ने हा अंदाज व्यक्त केला आहे. EY च्या मते टेलिकॉम सेक्टरमधील शुल्कवाढ 'अपरिहार्य' आहे कारण सध्याची संरचना ऑपरेटरला योग्य परतावा देऊ शकत नाही आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये तातडीने दर वाढविणे शक्य नसले तरीही 12 ते 18 महिन्यात दोन टप्प्यांमध्ये ही वाढ होऊ शकते, किंबहुना पहिला येणाऱ्या सहा महिन्यातच पहिली वाढ होईल, अशी माहिती EY चे उदयोन्मुख बाजारपेठ तंत्रज्ञान, मीडिया, एंटरटेनमेंट आणि टेलिकम्युनिकेशन (TMT) नेते प्रशांत सिंघल यांनी दिली आहे.

(हे वाचा-घरात 'या' मर्यादेपेक्षा जास्त सोनं असेल तर सावधान! आयकर विभाग आणू शकते जप्ती)

सिंघल असे म्हणाले की, 'दरांमध्ये वाढ अपरिहार्य आहे. उपभोक्त्यांसाठी दूरसंचार खर्च कमी आहे आणि येत्या सहा महिन्यात यामध्ये वाढ केली जाऊ शकते. मी असे नाही म्हणत आहे की ही वाढ होईलच. पण जितक्या लवकर होईल तेवढे  चांगले आहे.

बाजारात कंपन्या टिकून राहणे आवश्यक

ते पुढे असं म्हणाले की, 'कंपन्यांना सध्याची आर्थिक स्थिती आणि परवडणाऱ्या बाब याबाबत विचार करायला हवा. पण बाजारात टिकून राहणे निश्चित करण्यासाठी 12 ते 18 महिन्यात 2  वेळा दर वाढवले जाऊ शकतात आणि यातील पहिली वाढ येत्या 6 महिन्यातच होऊ शकते.'

गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच वाढल्या होत्या किंमती

(हे वाचा-मुलींना कोट्यधीश बनविणाऱ्या या योजनेत सरकारने दिली मोठी सवलत, जाणून घ्या नियम)

सिंघल पुढे म्हणाले की, हे नियामकीय हस्तक्षेपाने होते की टेलिकॉम उद्योग स्वत: हे काम पूर्ण करेल हे पाहणे बाकी आहे. मात्र शुल्क वृद्धी टेलिकॉम कंपन्यांसाठी आवश्यक आहे.' उल्लेखनीय आहे की दूरसंचार कंपन्यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कॉल, इंटरनेट आदी सेवांच्या दरात वाढ केली होती.

संपादन- जान्हवी भाटकर

First published: July 6, 2020, 8:56 AM IST

ताज्या बातम्या