मुलींना कोट्यधीश बनविणाऱ्या या योजनेत सरकारने दिली मोठी सवलत, जाणून घ्या सगळे नियम

मुलींना कोट्यधीश बनविणाऱ्या या योजनेत सरकारने दिली मोठी सवलत, जाणून घ्या सगळे नियम

या योजनेत भरलेल्या पैशांना इन्कम टॅक्स लागणार नाही. पैशांवरचं व्याज आणि शेवटी मिळणारी एकूण रक्कम यावर इन्कम टॅक्स लागणार नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 5 जुलै: कोरोना व्हायरसच्या साथीमुळे (Coronavirus Pandemic) सरकारने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठीच्या सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samriddhi Account) महत्त्वाची सवलत दिली आहे. खातं उघडण्यासाठी ही सवलत देण्यात आली असून लॉकडाऊन आणि इतर कारणांमुळे ज्यांना शक्य झालं नाही त्यांनाही या योजनेत आता खातं उघडता येऊ शकतं. कमी वयात मुलींसाठी  या योजनेत पैसे बचत करण्यास सुरुवात केली तर ती मोठी झाल्यानंतर मुलीला 1 कोटींपर्यंत रक्कम यात मिळू शकते.

पोस्ट ऑफिस (Post Office) विभागाने या संदर्भात नवा आदेश काढला आहे. त्यात ही सवलत देण्यात आली आहे.

सुकन्या समृद्धी योजनेत 31 जुलै 2020 किंवा त्या आधी मुलींच्या नावे खातं उघडता येऊ शकतं. ज्या मुलीचं वय हे 25 मार्च 2020 ते 30 जून  2020 या लॉकडाउन काळात 10 वर्ष पुर्ण झालं असेल त्यांना आता या योजनेत सहभागी होता येणार आहे. लॉकडाऊनमुळे ज्यांना या योजनेत सहभागी होता आलं नाही त्यांना आता मुलीच्या नावे खातं उघडता येणार असल्याने दिलासा मिळणार आहे.

मुलीचं उच्च शिक्षण किंवा लग्नासाठी यातून पालकांना मोठी रक्कम मिळणार आहे. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर हे पैसे मिळणार आहेत. मुलीचं वय कमी असतानाच पैसे भरायला सुरुवात केली तर पालक 15 वर्ष या योजनेत पैसे भरू शकतील.

इन्स्टाग्रामवरून कसे कमावले जातात पैसे? या स्टार्सची आहे कोट्यवधींची कमाई

वर्षभरात कमीतकमी 250 रुपयांपासून ते दीड लाखांपर्यंत पैसे पालकांना भरता येणार आहेत. या योजनेत भरलेल्या पैशांना इन्कम टॅक्स लागणार नाही. विशेष म्हणजे या योजनेतल्या पैशांवरचं व्याज आणि शेवटी मिळणारी एकूण रक्कम यावर इन्कम टॅक्स लागणार नाही.

FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खूशखबर! 31 जुलैपर्यंत नाही कापला जाणार 'हा' कर

वयाच्या 18 व्या वर्षी मुलगी आपल्या या खात्यात स्वत:व्यवहार करू शकणार आहे. आता दोन मुलींसाठीही खातं उघडता येणार असून त्यासाठी जन्माचा दाखला आणि एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे. या योजनेची माहिती तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये मिळू शकते.

संपादन - अजय कौटिकवार

 

 

First published: July 5, 2020, 7:51 PM IST

ताज्या बातम्या