मराठी बातम्या /बातम्या /मनी /

घरात 'या' मर्यादेपेक्षा जास्त सोनं असेल तर सावधान! आयकर विभाग आणू शकते जप्ती

घरात 'या' मर्यादेपेक्षा जास्त सोनं असेल तर सावधान! आयकर विभाग आणू शकते जप्ती

भारतात अनेक लोकं दागिने किंवा बिस्किटांच्या रुपात सोनेखरेदी करतात, अशावेळी हे माहित असणे गरजेचे आहे की तुम्ही किती प्रमाणात सोने घरी ठेवू शकता.

भारतात अनेक लोकं दागिने किंवा बिस्किटांच्या रुपात सोनेखरेदी करतात, अशावेळी हे माहित असणे गरजेचे आहे की तुम्ही किती प्रमाणात सोने घरी ठेवू शकता.

भारतात अनेक लोकं दागिने किंवा बिस्किटांच्या रुपात सोनेखरेदी करतात, अशावेळी हे माहित असणे गरजेचे आहे की तुम्ही किती प्रमाणात सोने घरी ठेवू शकता.

नवी दिल्ली, 06 जुलै : भारतामध्ये सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. गेल्या काही दिवसात सोन्याच्या वाढत्या किंमती पाहता त्यातून मोठा फायदा होऊ शकतो, याच हिशोबाने सोन्याकडे पाहिले जाते. अनेकजण हौस म्हणून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने देखील घरी ठेवतात. सोन्याच्या दागिन्यांसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. भारतीयांचे सोन्याप्रति असणारे प्रेम पाहता, मोठ्या प्रमाणात सोने आयात देखील केले जाते. दरम्यान लॉकडाऊन काळात सोने खरेदी-विक्री घटली आहे. त्यामुळे देशाच्या करंट अकाउंट डेफिसिट (CAD) मध्ये देखील कमतरता आली आहे. देशामध्ये अनेक लोकं दागिने किंवा बिस्किटांच्या रुपात सोनेखरेदी करतात, अशावेळी हे माहित असणे गरजेचे आहे की तुम्ही किती प्रमाणात सोने घरी ठेवू शकता. देशामध्ये अनेक लोक असे आहेत की सोन्यापासून बनलेले दागिने त्यांच्या घरीच असतात. मात्र आयकर नियमानुसार (Income Tax Rules) नुसार एका ठराविक मर्यादेपर्यंत तुम्ही सोने घरात ठेवू शकता. इनकम टॅक्स नियमांनुसार, जर तुम्ही सोने खरदीचा वैध स्रोत आणि पुरावा दाखवू शकलात, तर कितीही मर्यादेपर्यंत सोने घरामध्ये ठेवू शकता. तर वैध स्रोत नसल्यास ठराविक मर्यादेपर्यंतच घरात सोने ठेवता येईल. उत्पन्नाच्या साधन दाखवल्याशिवाय सोने घरात ठेवण्यासाठी देखील काही नियम आहेत. (हे वाचा-पैसे दुप्पट करण्याची पोस्टाची खात्रीशीर योजना! 124 महिन्यात होईल रक्कम डबल) नियमांनुसार, विवाहित महिला घरी 500 ग्रॅंम, अविवाहित महिला 250 ग्रॅम आणि पुरुष केवळ 100 ग्रॅम सोने इनकम प्रूफ दाखवल्याशिवाय ठेवू शकतात. तिन्ही वर्गांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त सोने आढळून आल्यास आयकर विभागाकडून तुमचे दागिने जप्त केले जाऊ शकतात. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर वेगवेगळ्या वर्गातील लोक ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सोने घरामध्ये ठेवू शकतात, मात्र त्याकरता त्यांना उत्पन्नाचा पुरावा द्यावा लागेल. त्याचप्रमाणे सोन्याची खरेदी किंवा भेट म्हणून मिळाल्याचा पुरावा द्यावा लागेल. या अटी पूर्ण केल्यास कितीही सोने घरात ठेवू शकता केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाच्या मते (CBDT) जर कोणत्याही व्यक्तीकडे वारशाने मिळालेल्या सोन्यासह उपलब्ध सोन्याचा वैध स्रोत आहे आणि तो त्याचे प्रमाण देऊ शकतो तर तो कितीही सोन्याचे दागिने त्याच्याकडे ठेवू शकतो. उत्पन्नाच्या वैध पुराव्याशिवाय मर्यादित सोन्यापेक्षा जास्त सोने जप्त केले जाऊ शकते. आयकर नियमांनुसार, भेट म्हणून मिळालेले 50,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे दागिने किंवा वारसाहक्काने मिळालेले सोन्याच्या दागिन्यांवर कर द्यावा लागत नाही, मात्र तुम्हाला ते सिद्ध करावे लागेल की ते सोने गिफ्ट म्हणून किंवा वारसाहक्काने मिळाले आहे. (हे वाचा-इन्स्टाग्रामवरून कसे कमावले जातात पैसे? या स्टार्सची आहे कोट्यवधींची कमाई) जर एखाद्याला सोने भेट किंवा वारसाहक्काने मिळाले आहे तर त्याला ते देणाऱ्या व्यक्तिच्या नावाची पावतीसह अन्य माहिती द्यावी लागेल. त्याचप्रमाणे वारसाहक्काने सोने मिळाले असल्यास फॅमिली सेटलमेंट अॅग्रीमेंट किंवा सोने भेट म्हणून देण्यात आल्याचे अग्रीमेटं पुराव्यासाठी द्यावे लागेल. संपादन- जान्हवी भाटकर
First published:

Tags: Gold, Gold and silver prices today, Gold jewellery

पुढील बातम्या