SBIच्या 44 कोटी ग्राहकांना मोठा दिलासा; एका कॉलवरच होतील महत्त्वाची कामं

SBIच्या 44 कोटी ग्राहकांना मोठा दिलासा; एका कॉलवरच होतील महत्त्वाची कामं

स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी कॉन्टॅक्ट लेस (Contact-less Service) सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता युजर्स घरबसल्या बँकांशी संबंधीत कामं करु शकणार आहेत.

  • Share this:

नवी दिली, 08 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Second Wave of Coronavirus) देशात गंभीर परिस्थिती निर्माण केलेली आहे. दररोज लाखोंच्या संख्येने लोक कोरोना संक्रमित होत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काही बॅंकांनी आपल्या ग्राहकांसाठी विविध सुविधा सुरु केलेल्या आहेत. आता SBIने आपल्या ग्राहकांसाठी घरबसल्या बँकेची विविध कामं उरकण्याची सोय केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी कॉन्टॅक्ट लेस (Contact-less Service) सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता युजर्स घरबसल्या बँकांशी संबंधीत कामं करु शकणार आहेत.

SBI ने जारी केला टोल फ्री नंबर

SBI ने ग्राहकांसाठी टोल फ्री नंबर जारी केलेला आहे. State Bank of India आपल्या ट्विटर हॅंडलवर याची माहिती देण्यात आहे. State Bank of India संपर्करहीत सेवा देत आहे. ज्यामुळे तुम्ही तुमची बॅंकेची कामं सहज पूर्ण करु शकाल, त्याबरोबर टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. एसबीआयचा टोल फ्री क्रमांक असणाऱ्या 1800 112 211  आणि  1800 425 3800 या क्रमाकांवर तुम्ही कॉल करू शकता.

(हे वाचा- गुंतवणुकीसाठी असे निवडा म्युच्युअल फंड, होईल चांगला फायदा)

Stay safe at home, we are there to serve you. SBI provides you a contactless service that will help you with your urgent banking needs.

Call our toll free number 1800 112 211 or 1800 425 3800.#SBIAapkeSaath #StayStrongIndia #SBI #StateBankOfIndia #IVR #TollFree pic.twitter.com/tRmKnOahfZ

— State Bank of India (@TheOfficialSBI) May 5, 2021

एका कॉलवर सर्व सुविधा

SBI ने आपल्या ट्वीटर हॅंडलवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. ज्यात फोन कॉलिंगच्या सुविधेची माहिती देण्यात आली आहे. SBIच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन कोणकोणत्या सुविधा मिळतील हे सांगण्यात आलं आहे. अकाऊंट बॅलन्सची माहिती, लास्ट 5 ट्रान्जेक्शन, ATM बंद करणे,सुरु करमे, ATM पिन किंवा ग्रीन पिन जनरेट करणे. नवीन ATM साठी अप्लाय करणे या सोई देण्यात आल्यात. त्यामुळे SBI च्या 44 कोटी ग्राहकांना फायदा मिळणार आहे.

(हे वाचा- दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार नाही; केंद्र सरकारचा दावा)

याआधी गर्दी टाळण्यासठी स्टेट बँक ऑफ इंडियाने बँक ब्रांचमध्ये न जाता घरबसल्या व्हिडीओद्वारे केवायसी एपडेट (KYC Update BY Video) करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला होता..

Published by: News18 Desk
First published: May 8, 2021, 4:06 PM IST

ताज्या बातम्या