नवी दिल्ली, 08 मे : भारत सध्या कोविड -19 च्या दुसर्या लाटेचा (Corona Second Wave) सामना करीत आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांना या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला आहे. दरम्यान, वित्त मंत्रालयाने (Finance Ministry) शुक्रवारी आपल्या मासिक अहवालात कोविड -19 च्या दुसर्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर (Indian Economy) होणारा परिणाम पहिल्या लाटेच्या तुलनेत सौम्य असेल, असे म्हटले आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोरोना संसर्गाच्या या लाटेमुळे होणाऱ्या आर्थिक उलाढालीवर अनिष्ठ परिणाम होणार असल्याचे कबूल केले आहे.
पहिल्या लाटेपेक्षा दुसर्या लाटेचा अर्थकारणावर कमी परिणाम होण्याची काही कारणे अहवालात सांगण्यात आली आहेत. दुसरी लाट पहिल्यापेक्षा भीषण असली तरी यावेळी परिस्थिती कशी हाताळायची याचा अंदाज होता. त्यामुळे काही नियम पाळून आर्थिक चक्र सुरू ठेवण्याचे प्रयत्न झाले, कडक टाळेबंदी हा शेवटचा पर्याय ठेवल्याने पहिल्या ऐवढी झळ अर्थव्यवस्थेला दुसर्या लाटेमध्ये बसणार नाही असे अपेक्षित आहे.
केंद्र सरकारची आर्थिक स्थिती सुधारली
वित्त मंत्रालयाने म्हटलं आहे की, आर्थिक वर्ष 2020-21 च्या दुसर्या टप्प्यातील आर्थिक प्रक्रियांमध्ये सुधारणा झाल्यानं केंद्र सरकारची वित्तीय स्थिती सुधारली आहे. सन 2020-21 मध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्ष कर संकलन सुधारित अंदाजापेक्षा (Revised Estimates) 4.5 टक्के जास्त आणि 2019-2020 च्या तुलनेत पाच टक्के जास्त होते. यावरून कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षा सध्याची आर्थिक स्थितीत सुधारणा असल्याचे दिसत आहे.
हे वाचा - सोन्याच्या खरेदी-विक्रीबाबतचा हा नियम बदलणार, तुमच्या दागिन्यांवर होणार परिणाम?
जीएसटीमध्ये चांगली वाढ
जीएसटी संग्रहात चांगली वाढ नोंदविण्यात आली असल्याचे अहवालात म्हटले आहे. मागील सहा महिन्यांपासून जीएसटीचे मासिक संग्रह एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. एप्रिलमध्ये विक्रमी 1.41 लाख कोटी रुपये जमा झाले होते आणि हे अर्थव्यवस्थेत निरंतर सुधारणा होत असल्याचे लक्षण आहे.
हे वाचा - अवघ्या 50 हजारात सुरू करा हा व्यवसाय; दर महिन्याला होईल 1 कोटी कमाई
कोरोना संक्रमणाच्या दुसर्या लाटेचा परिणाम बाजाराच्या उत्साहावर मात्र झाला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (निफ्टी) आणि मुंबई शेअर बाजार (सेन्सेक्स) अनुक्रमे 0.4 आणि 1.5 टक्क्यांनी घसरला आहे. तर एप्रिलमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया 2.3 टक्क्यांनी घसरून 74.51 वर आला आहे. वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की 2020-21 मध्ये खुल्या बाजारात सरकारी सिक्युरिटीज खरेदी केल्यामुळे आणि आरबीआयकडून बाजारात पैसा खेळता ठेवल्याने देशांतर्गत बाजाराची परिस्थिती सध्या सामान्य आहे. डिजिटल पेमेेंटमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात झालेली वाढ ही गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापेक्षा दुप्पट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus, Economy