Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Corona Period : बँकेत जाण्याची अजिबात गरज नाही; घरबसल्याच करा KYC अपडेट

Corona Period : बँकेत जाण्याची अजिबात गरज नाही; घरबसल्याच करा KYC अपडेट

आता घरबसल्या KYC अपडेट

आता घरबसल्या KYC अपडेट

कधीकधी ऑनलाईन बेसिक बँक अकाऊंट उघडलं जातं. पण पेपर डॉक्युमेंटेशन अनिवार्य असतं. त्यासाठी बँकेत जावं लागतं. पण आता त्याची गरज नाही.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 25 एप्रिल :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Increasing patient of corona) पाहता लोकांना घरीच राहण्याचं आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र बँकेसारख्या (Bank) ठिकाणी गर्दी कशी टाळायची असा प्रश्न निर्माण होतो. या परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नागरिकांना बँक ब्रांचमध्ये न जाता घरबसल्या व्हिडिओद्वारे केवायसी अपडेट (KYC Update BY Video) करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

KYC रिझर्व्ह बँकेद्वारे (RBI) संचलित अकाऊंट अप्रूव्हलची प्रक्रिया आहे. KYC म्हणजे 'नो योर कस्टमर'द्वारे (Know Your Customer) ग्राहकांची सविस्तर माहिती घेतली जाते. त्यासाठी बँका काही फॉर्म आणि डॉक्युमेंट घेतात. KYC साठी पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, मनरेगा कार्ड, पॅन कार्ड अशी कागदपत्रे आणि ओळखपत्रे लागतात.

देशातल्या सर्वात मोठ्या बँकेने व्हिडिओ केवायसी (Video KYC)ची सुरुवात करून खातेधारकांना दिलासा दिला आहे. गेल्या काही वर्षापासून खाजगी बँकांनी हा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि फेशियल रेकग्नेशन टेक्नोलॉजीद्वारे संचालित ही डिजिटल प्रोसेस कॉन्टॅक्टलेस आणि पेपरलेस प्रोसेस आहे.

 हे वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारतीय अर्थव्यस्थेलाही मोठा धक्का? GDP घसरण्याचा अंदाज

एसबीआयचे चेअरमन दिनेश खारा (Dinesh Khara) यांच्या मते ग्राहकांसाठी ऑनलाईन खाते उघडण्याची सोय ही कोरोना काळात नागरिकांच्या सोईची तर आहेच. त्यासोबत मोबाईल बँकिंग क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार आहे.तर ग्राहकांना त्यांच्या बँकिंग आवश्यकतांसाठी डिजिटलदृष्ट्या सक्षम बनवणार आहे.

YONO अ‍ॅपवरून KYC अपडेट

1) आपल्या फोनवर YONO अ‍ॅप डाऊनलोड करा.

2) New to SBI’ वर क्लिक करा आणि  ‘Insta Plus Savings Account’  सिलेक्ट करा.

3) अ‍ॅपमध्ये आपलं आधार कार्डचे डिटेल भरा.

4) आधार ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यावर यूजर्सला आपले पर्सनल डिटेल्स  भरावे लागतात.

5) त्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व्हिडिओ कॉल शेड्युल करावं लागेल.

6) व्हिडीओ केवायसी पूर्ण होताच SBI मध्ये तुमचं खातं उघडले जाईल.

 हे वाचा - Online Shopping करताना तुमची छोटीशी चूकही पडेल महागात; रिकामं होईल बँक खातं)

नोव्हेबर 2017 मध्ये YONO अ‍ॅप लाँन्च झाल्यावर 8 कोटी लोकांनी डाऊनलोड केलं आहे. तर, 3.7 कोटीपेक्षा जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. SBI ने YONO अ‍ॅपसाठी 20 पेक्षा अधिक कँटेगरीत 100 पेक्षा जास्त कंपन्यांबरोबर टायअप केलं आहे.

ब्रांचमध्ये न जाताच उघडा खातं

अकाऊंट उघडण्यासाठी ग्राहकांना बँकेच्या शाखेत जावे लागते. तिथं फॉर्म भरावा लागतो. त्यावर हस्ताक्षर करून आपले डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. कधीकधी ऑनलाईन बेसिक अकाऊंट उघडलं जातं. पण पेपर डॉक्युमेंटेशन अनिवार्य असतं. आता व्हिडिओ कॉलिंगद्वारे खाते उघडण्याची सोय ही डिजीटलायझेशनच्या दृष्टीने मोठं पाऊल आहे. त्याने ब्रांचलेस बँकिंगला नवीन दिशा मिळणार आहे. त्याशिवाय ग्राहकांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.

First published:

Tags: SBI, Sbi account, Sbi alert, SBI Bank News