मुंबई : तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या पगारातून जर EPFO ची रक्कम कापली जात असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला तुमच्या खात्यावर वेळच्या वेळी ही रक्कम जमा होते की नाही ते तपासणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला आज आम्ही सोपी पद्धत सांगणार आहोत. EPFO वर तुमच्या खात्यात किती रक्कम जमा झाली ते आता ऑनलाइन पाहता येणार आहे. EPFO च्या अनेक सेवा ऑनलाइन झाल्याने वेळ वाचतो आणि कामंही लवकर होतात. पीएफ खातेधारकालाही त्याच्या पीएफ खात्यात किती पैसे आहेत हे जाणून घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. EPFO ग्राहकांना 4 प्रकारे हे तपासता येणार आहे. पीएफ खातेधारक नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून मिस कॉल करून किंवा एसएमएसद्वारे शिल्लक माहिती मिळवू शकतो. याशिवाय ऑनलाइन उमंग अॅपच्या मदतीने आणि ईपीएफओच्या वेबसाइटवर लॉग इन करून त्याच्या पीएफ खात्यात किती पैसे आहेत ते पाहू शकतात. बातमीची लिंक -Zero Cost Term Insurance: आता टर्म पॉलिसी बंद केल्यावर प्रीमियम मिळेल परत, वाचा आश्चर्यकारक फायदे तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यायचा आहे. त्यानंतर एका SMS द्वारे तुमच्या खात्यावर किती रक्कम आहे याची माहिती मिळेल. तुम्हाला जर ही माहिती SMS करून हवी असेल तर तोही पर्याय आहे. त्यासाठी तुम्हाला रजिस्टर केलेल्या नंबरवरून 7738299899 या नंबरवर SMS पाठवायचा आहे. उदाहरणार्थ तुम्हाला EPFO UAN ENG (ENG म्हणजे तिथे भाषा लिहायची आहे. ENG च्या जागी HIN असं लिहू शकता) तुम्हाला 7738299899 क्रमांकावर SMS पाठवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला EPFO कडून तुमच्या खात्यावरील जमा रकमेचा एक मेसेज येईल. हे वाचा-Stock : बाबा रामदेव यांच्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, 3 वर्षात 4 वेळा कमाई ईपीएफ पासबुक पोर्टलवर जाऊन तिथे UAN नंबर आणि पासवर्ड अपलोड करू शकता. तिथे दिलेली बेरीज वजाबाकी अचून लिहा आणि सबमिट पर्याय निवडा. तुमच्या समोर पासबुक उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यावर जमा होणाऱ्या PF चे डिटेल्स पाहता येतील. तुम्ही उमंग अॅप डाऊनलोड करून देखील पाहू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.