जाहिरात
मराठी बातम्या / मनी / केंद्र सरकारच्या या योजनेत दीड लाख वार्षिक गुंतवून मिळवा 1 कोटी, वाचा काय आहे स्कीम?

केंद्र सरकारच्या या योजनेत दीड लाख वार्षिक गुंतवून मिळवा 1 कोटी, वाचा काय आहे स्कीम?

केंद्र सरकारच्या या योजनेत दीड लाख वार्षिक गुंतवून मिळवा 1 कोटी, वाचा काय आहे स्कीम?

PPF Crorepati Calculator: पब्लिक प्रोव्हिडेंट फंड या स्कीममध्ये वार्षिक 1,50,000 रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटींचा फंड उभा करू शकता

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर: केंद्र सरकारकडून  (Central Government) विविध योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (Public provident fund) एक खास स्कीम आहे. यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपयांचा फंड उभा करू शकता. पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही केवळ 500 रुपयांपासून सुरुवात करू शकता. गुंतवणुकीसाठी हा एक बेस्ट पर्याय आहे. ही स्कीम तुम्ही सरकारी बँक, पोस्ट ऑफिस आणि प्रायव्हेट बँकेतून घेऊ शकता. पीपीएफ अकाउंटमध्ये तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकता, तर महिन्याला तुम्हाला जास्तीत जास्त 12500 रुपये गुंतवणूक करू शकता. एफडीशिवाय अन्य छोट्या बचत योजनांच्या तुलनेत या खात्यातून तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल. PPF च्या मॅच्युरिटीचा कालावधी 15 वर्षांचा आहे. तुम्ही यानंतर तुमची रक्कम काढून घेऊ शकता किंवा गुंतवणूक पुढे सुरू ठेवण्याचा पर्याय निवडू शकता. मॅच्युरिटीनंतर 5-5 वर्षांच्या कालावधीसाठी तुम्हाला गुंतवणूक वाढवता येईल. हे वाचा- PM Kisan: या मोबाइल अ‍ॅपमध्ये नोंदणी केल्यानंतर मिळतील 6000, अशी आहे प्रक्रिया किती मिळेल व्याज? PPF मध्ये आता गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. दरवर्षी मार्च महिन्यात व्याजाचे पेमेंट केले जाते. याशिवाय तुम्ही पीपीएफमध्ये कोणत्याही अल्पवयीन मुलासाठी पालक म्हणून खातं उघडू शकता. कसा उभा कराल 1 कोटींचा फंड? जर तुम्हाला या योजनेतून 1 कोटी रुपयांचा फंड मिळवायचा असेल तर गुंतवणुकीचा कालावधी 25 वर्ष करावा लागेल. वर्षाला दीड लाख या हिशोबाने तुमचे 37,50,000 रुपये जमा होतील. यावर वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज मिळाल्यास व्याजाची रक्कम 65,58,012 रुपये होईल. त्यामुळे मॅच्युरिटीपर्यंत एकूण रक्कम 1,03,08,012 रुपये होईल. हे वाचा- बाप्पाच्या आगमनादिवशी स्वस्त झालं सोनं, 500 रुपयांनी उतरले भाव; काय आहेत आजचे दर मिळेल टॅक्स सवलतीचा फायदा केंद्र सरकारची गॅरंटी असणाऱ्या या स्कीममध्ये तुम्ही छोटी गुंतवणूक करून चांगला फंड मिळवू शकता. यावर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर करसवलत देखील मिळते. PPF च्या मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या रकमेवर देखील कर नाही आहे. इन्कम टॅक्स कायदा सेक्शन 80C अंतर्गत ही करसवलत दिली जात

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात