मराठी बातम्या /बातम्या /मनी /दिलासा : बेरोजगारांना मिळत राहणार भत्‍ता, श्रम मंत्रालयनं जून 2022 पर्यंत वाढवली योजना

दिलासा : बेरोजगारांना मिळत राहणार भत्‍ता, श्रम मंत्रालयनं जून 2022 पर्यंत वाढवली योजना

आता जून 2022 पर्यंत या योजनेत अर्ज केल्यानंतर, भत्त्याचा लाभ घेता येईल. कोरोनामुळे, परिस्थिती अजूनही रुळावर येत नसल्यानं ईएसआयसीच्या 185 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

आता जून 2022 पर्यंत या योजनेत अर्ज केल्यानंतर, भत्त्याचा लाभ घेता येईल. कोरोनामुळे, परिस्थिती अजूनही रुळावर येत नसल्यानं ईएसआयसीच्या 185 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

आता जून 2022 पर्यंत या योजनेत अर्ज केल्यानंतर, भत्त्याचा लाभ घेता येईल. कोरोनामुळे, परिस्थिती अजूनही रुळावर येत नसल्यानं ईएसआयसीच्या 185 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : कोरोनाच्या काळात ज्यांनी नोकरी गमावली त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. श्रम मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळाने चालवलेल्या अटल बीमा व्यापारी कल्याण योजनेला (Atal Beemit Vyakti Kalyan Yojna)  मुदतवाढ देण्यात आली आहे. आता जून 2022 पर्यंत या योजनेत अर्ज केल्यानंतर, भत्त्याचा लाभ घेता येईल. कोरोनामुळे, परिस्थिती अजूनही रुळावर येत नसल्यानं ईएसआयसीच्या 185 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेचा लाभ अशा लोकांना दिला जातो ज्यांनी नोकरी गमावली आहे. या अंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीला ESIC (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) कडून आर्थिक मदत किंवा भत्ता दिला जातो, तसेच अर्जदार आणि कुटुंबाला सहा महिन्यांसाठी ESIC कव्हर किंवा वैद्यकीय सुविधा मिळते. जर एखादी व्यक्तीने त्याची नोकरी गमावली असेस, तर तो पुढील सहा महिन्यांसाठी ईएसआयसीद्वारे त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांवर उपचार करू शकतो.

एमके शर्मा, विमा आयुक्त, महसूल आणि फायदे, कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी), म्हणतात की या योजनेअंतर्गत पगाराच्या 50 टक्के रक्कम जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दिली जाते. कोणताही बेरोजगार स्वतःसाठी नवीन नोकरी शोधण्यासाठी तीन महिने हा पुरेसा वेळ आहे. दरम्यान, जर कोणाला नोकरी मिळाली आणि ईएसआयसीमध्ये त्याचे योगदान येऊ लागले, तर ही रक्कम तीन महिन्यांपूर्वी थांबवली जाते. तथापि, जर नोकरी पुन्हा गमावली गेली, तर त्याला पुन्हा या योजनेच्या उर्वरित भागाचा लाभ मिळू शकेल.

हे वाचा - खूप त्रास होतोय, यांना आता ऑफिसला बोलवा; मालकाला कर्मचाऱ्याच्या पत्नीनं लिहलं पत्र

नवीन ESIC बेड बनवले जातील

ABVKY ची मुदत वाढवण्याव्यतिरिक्त, इतर काही महत्त्वाचे निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आले आहेत. ज्यामध्ये कर्नाटकात 100 खाटांची दोन ईएसआयसी रुग्णालये बांधली जातील. याशिवाय केरळमध्ये सात नवीन दवाखानेही उघडण्यात येतील. उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर येथे 30 बेडचे नवीन ईएसआयसी रुग्णालय बांधण्यात येणार आहे.

First published:
top videos

    Tags: Epfo news, Modi government