• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर, मात्र दर सामान्यांना न परवडणारेच!

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर, मात्र दर सामान्यांना न परवडणारेच!

Petrol Price Today: राजधानी दिल्लीसह देशभरातील विविध शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती आज स्थिर आहेत. सरकारी तेल कंपनी IOCL ने जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनुसार आज मुंबईत पेट्रोल 107.39 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 96.33 रुपये प्रति लीटर आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 03 सप्टेंबर: राजधानी दिल्लीसह देशभरातील विविध शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती  (Petrol Diesel Price Today) आज स्थिर आहेत. शुक्रवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. गुरुवारप्रमाणे आजही इंधनाचे दर (Fuel Rates Today) स्थिर आहेत. आज या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपनी IOCL ने जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनुसार आज मुंबईत पेट्रोल 107.39 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 96.33 रुपये प्रति लीटर आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेला इंधनाचे दर स्वस्त झाले होते. . बुधवारी पेट्रोल-डिझेलचे दर 15-15 पैशांनी उतरले होते. आज पुन्हा एकदा कोणताही बदल यामध्ये झालेला नाही. परिणामी पेट्रोल-डिझेलचे दर अद्यापही सामान्यांना न परवडणारेच आहेत. देशभरातील 19 राज्यात पेट्रोलचे दर अजूनही शंभरीपार आहेत. यामध्ये  मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाख यांचा समावेश आहे. या इंधन दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक गोष्टींच्या ट्रान्सपोर्टवर देखील होत असून त्यामुळे या गोष्टींमध्ये देखील दरवाढ होत आहे. ही दरवाढ सामान्यांच्या खिशाला चाप देणारी ठरत आहे. हे वाचा-LPG Gas Cylinder च्या सब्सिडीचे पैसे का मिळत नाही आहेत? वाचा काय आहे कारण काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर? (Petrol-Diesel Price on 3rd Sept 2021) >> दिल्ली पेट्रोल 101.34 रुपये आणि डिझेल 88.77 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 107.39 रुपये आणि डिझेल 96.33 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 99.08 रुपये आणि डिझेल 93.38 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर >> नोएडा पेट्रोल 98.65 रुपये आणि डिझेल 89.34 रुपये प्रति लीटर हे वाचा-125 Rupee Coin: 125 रुपयांचं खास नाणं जारी, कुठे आणि कशाप्रकारे खरेदी करता येईल? >> जयपूर पेट्रोल 108.27 रुपये आणि डिझेल 97.91 रुपये प्रति लीटर >> भोपाळ पेट्रोल 109.77 रुपये आणि डिझेल 97.57 रुपये प्रति लीटर SMS करून जाणून घ्या इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.  
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: