मराठी बातम्या /बातम्या /मनी /

LPG Gas Cylinder च्या सब्सिडीचे पैसे का मिळत नाही आहेत? वाचा काय आहे कारण

LPG Gas Cylinder च्या सब्सिडीचे पैसे का मिळत नाही आहेत? वाचा काय आहे कारण

गेल्या काही महिन्यांपासून एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत सातत्यानं मोठी वाढ होत आहे. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरवर सरकारकडून दिलं जाणारं अनुदान (Subsidy on LPG Gas Cylinder) गेल्या काही दिवसांपासून खात्यावर जमा होत नसल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत. जाणून घ्या काय आहे कारण

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 02 सप्टेंबर: देशात एकीकडे कोरोनामुळे (Coronavirus in India) वारंवार लागू करण्यात येत असलेले कडक निर्बंध किंवा लॉकडाउनमुळे नागरिक अडचणीत आले आहेत. तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्यानं वाढ होते आहे. वाढत्या महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत सातत्यानं मोठी वाढ होत आहे. इंधनाचे दर वाढल्याने त्यावर अवलंबून असलेल्या अन्य बाबींच्या किमतीही वाढत आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसत आहे. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरवर सरकारकडून दिलं जाणारं अनुदान (Subsidy on LPG Gas Cylinder) गेल्या काही दिवसांपासून खात्यावर जमा होत नसल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत. यावर सरकारी कंपन्यांकडून उत्तर देण्यात आलं आहे.

घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या किमती (LPG Price) वाढल्यानं त्रस्त असलेले नागरिक आता त्यावरील अनुदान खात्यावर जमा होत नसल्यानं अधिक वैतागले आहेत. MoPNG e-Seva हा गॅस आणि इंधन क्षेत्रातील तक्रारींचं निवारण करणारा प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मने ट्वीट करून नागरिकांच्या अनुदानाबाबतच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 'एका वर्षाहून अधिक कालावधीपासून आम्हाला एलपीजी सिलेंडरचं अनुदान मिळालेलं नाही. मी याबाबत ऑनलाइन पोर्टलवर तक्रार दाखल केली. परंतु, मला उत्तर मिळालं नाही,' असं ट्वीट एका ग्राहकाने केलं. त्यावर MoPNG e-Seva ने उत्तर देताना सांगितलं, 'प्रिय ग्राहक, मे 2020 पासून घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या दरात फारसा फरक राहिलेला नाही. त्यामुळे ग्राहकांना अनुदान वर्ग करण्यात आलेलं नाही.'

हे वाचा-125 Rupee Coin: 125 रुपयांचं खास नाणं जारी, कुठे आणि कशाप्रकारे खरेदी करता येईल?

'यापुढे आम्हाला अनुदान मिळणार की नाही,' असं संबंधित युजरने पुन्हा ट्वीटद्वारे विचारलं असता, MoPNG e-Sevaने ग्राहकाकडे त्याचा सर्व तपशील मागितला. याबाबत MoPNG e-Seva ने लिहिलं, 'तुमच्या मदतीसाठी तुमचा 16 अंकी एलपीजी आयडी, एजन्सीचं नाव, जिल्हा आणि नोंदणीकृत डीएम क्रमांक द्यावा. अनुदानाविषयी माहिती घ्यायची असेल त्यांनी याच प्रक्रियेचा वापर करावा.'

यापूर्वी 18 ऑगस्टला घरगुती गॅसच्या दरात 25.50 रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. देशातली सर्वांत मोठी इंधन कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं (IOC) विनाअनुदानित 14.2 किलोग्रॅम सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ केली आहे. तसंच 19 किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या सिलिंडरच्या दरात 75 रुपयांनी वाढ झाली आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात फारसा फरक नसल्याने सध्या ग्राहकांना अनुदान मिळत नसल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: LPG Price, Money