मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Price Today: या शहरात 1 लीटर पेट्रोलचे दर ₹82.96 तर डिझेल 77.13 रुपयांवर; वाचा आजचा भाव

Petrol Price Today: या शहरात 1 लीटर पेट्रोलचे दर ₹82.96 तर डिझेल 77.13 रुपयांवर; वाचा आजचा भाव

सरकारी तेल कंपन्यांनी आज 9 नोव्हेंबर रोजी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Price Today) दर जारी केले आहेत. आज देखील इंधनाच्या दरात (Fuel Price Today) कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सरकारी तेल कंपन्यांनी आज 9 नोव्हेंबर रोजी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Price Today) दर जारी केले आहेत. आज देखील इंधनाच्या दरात (Fuel Price Today) कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सरकारी तेल कंपन्यांनी आज 9 नोव्हेंबर रोजी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Price Today) दर जारी केले आहेत. आज देखील इंधनाच्या दरात (Fuel Price Today) कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर: सरकारी तेल कंपन्यांनी आज 9 नोव्हेंबर रोजी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Price Today) दर जारी केले आहेत. आज देखील इंधनाच्या दरात (Fuel Price Today) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन दरांच्या मते, आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Price) 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे. याआधी या आठवड्यात रविवार आणि सोमवारी देखील इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.

केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल साधारण 10 रुपयांनी कमी झालं होतं. दिवाळी दिवशी अनेक शहरात एवढी कपात पाहायला मिळाली होती. अनेक राज्यांमध्ये तर राज्य सरकारांनी देखील किंमती कमी केल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेल 12-12 रुपयांनी कमी झालं आहे.

आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol-Diesel Rate Today)

>> दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर

>> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर

>> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर

हे वाचा-SMS आणि मिस्ड कॉलद्वारे चेक करा बँक बॅलेन्स, PNB बँकेची सुविधा, पाहा प्रोसेस

>> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर

>> नोएडा पेट्रोल 95.51 रुपये आणि डिझेल 87.01 रुपये प्रति लीटर

>> श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लीटर

>> पोर्ट ब्लेयर पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लीटर

दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते

हे वाचा-आता EMI वरही काढता येणार विमानाचं तिकीट, Spicejet ची खास सुविधा

अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात

First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise, Petrol Diesel hike