मुंबई, 8 नोव्हेंबर : सध्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे लोक बँकेतून पैसे काढून खर्च करण्यापेक्षा ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य देतात. मात्र प्रत्येक वेळी ऑनलाईन पेमेंटमुळे नेमका किती खर्च झाला याचा अंदाज कधी कधी येत नाही. त्यामुळे आपला बँक बॅलेन्स पटकन कळणेही गरजेचं असतं. मात्र व्यस्त जीवनात प्रत्येक वेळी लोकांना बँकेच्या शाखेत जाता येत नाही. बँकेची महत्त्वाची कामं बँकेच्या शाखेत न जाता पार पडली तर? तुमचे खाते पंजाब नॅशनल बँकेत म्हणजेच पीएनबीमध्ये असेल तर तुम्हाला खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. पंजाब नॅशनल बँक तुम्हाला घरबसल्या खात्यातील शिल्लक माहिती मिळवण्याची सुविधा देते.
मिस कॉल द्या आणि बँक बॅलेन्स तपासा
तुम्ही तुमच्या PNB खात्यातील शिल्लक फक्त एका मिस्ड कॉलने तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात नोंदणीकृत तुमच्या मोबाईल क्रमांकावरून 1800-180-2223 आणि 0120-2303090 यापैकी कोणत्याही क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. मिस्ड कॉलनंतर काही वेळातच तुम्हाला एक मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक रकमेची माहिती मिळेल.
आता EMI वरही काढता येणार विमानाचं तिकीट, Spicejet ची खास सुविधा
जर तुमची PNB मध्ये दोन खाती असतील आणि दोन्हीमध्ये एकच मोबाईल नंबर नोंदणीकृत असेल, तर तुम्ही एकाच नंबरवर दोन्ही खात्यांची शिल्लक माहिती एसएमएसद्वारे मिळवू शकता. जर तुमच्या बँक खात्यात मोबाईल क्रमांक नोंदणीकृत नसेल, तर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन तुमचा मोबाईल क्रमांक नोंदवू शकता.
विना Internet ही करता येईल UPI Payment, पाहा काय आहे सोपी पद्धत
मेसेज पाठवून बँक बॅलेन्स तपासा
तुमच्या PNB खात्यातील शिल्लक मेसेज पाठवून देखील तपासू शकता. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून BAL टाईप करा आणि स्पेस दाबा आणि 16 अंकी खाते क्रमांक टाका आणि हा एसएमएस 5607040 क्रमांकावर पाठवा. याच्या काही सेकंदांनंतर, संपूर्ण माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे पाठविली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.