• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत दिलासा नाहीच, सलग 15व्या दिवशी किमती स्थिर

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत दिलासा नाहीच, सलग 15व्या दिवशी किमती स्थिर

मागील 5 सप्टेंबरला तेल कंपन्यांनी इंधन दरात 15 पैशांची कपात केली होती. त्यानंतर किंमतीत कोणतीही कमी झालेली नाही. अद्यापही पेट्रोल दर 100 पार आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : सलग 15 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. IOCL ने आज आठवड्याच्या सुरुवातीला नवे दर जारी केले. मागील 5 सप्टेंबरला तेल कंपन्यांनी इंधन दरात 15 पैशांची कपात केली होती. त्यानंतर किंमतीत कोणतीही कमी झालेली नाही. अद्यापही पेट्रोल दर 100 पार आहे. पेट्रोल-डिझेल भाव (Petrol Diesel Price on 20 September 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर >> नोएडात पेट्रोल 98.52 रुपये आणि डिझेल 89.21 रुपये प्रति लीटर >> जयपुरमध्ये पेट्रोल 108.17 रुपये आणि डिझेल 97.76 रुपये प्रति लीटर >> भोपाळमध्ये पेट्रोल 109.63 रुपये आणि डिझेल 97.43 रुपये प्रति लीटर >> बेंगळुरूत पेट्रोल 104.70 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लीटर >> लखनऊमध्ये पेट्रोल 98.30 रुपये आणि डिझेल 89.02 रुपये प्रति लीटर >> पटनामध्ये पेट्रोल 103.79 रुपये आणि डिझेल 94.55 रुपये प्रति लीटर

    तुमचं Aadhaar-Pan कार्ड लिंक आहे का? नसेल तर मिनिटांत असं करा लिंक

    वस्तू आणि सेवा कर अर्थात GST काउंसिलची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी याबाबत बोलताना सांगितलं, की 'पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करण्याची ही योग्य वेळ नाही. महसुलाशी निगडित अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागेल. बैठकीत यावर चर्चा झाली नाही' IOCL कडून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जारी केल्या जातात. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर SMS द्वारे आपल्या शहरात पेट्रोल-डिझेल भाव तपासता येतात.

    1 लाखात सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला होईल 40000 हून अधिक नफा; पाहा डिटेल्स

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published: