नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : आज 28 सप्टेंबर मंगळवारी पेट्रोल-डिझेल दरात वाढ (Petrol-diesel price today) झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी जवळपास 22 दिवसांनंतर आज पेट्रोल दरात वाढ (Petrol price hike) केली आहे. तर सलग चौथ्या दिवशी डिझेलच्या किंमतीही वाढल्या आहेत. आज राजधानी दिल्लीत पेट्रोल दर 20 पैशांनी वाढवण्यात आलं आहे. तर डिझेल 25 पैशांनी महागलं आहे. मुंबईत पेट्रोल दरात आज 21 पैशांची वाढ झाली आहे.
इंडियन ऑयल कॉर्पोरेशननुसार (IOCL), या वाढत्या किंमतीनंतर दिल्लीत पेट्रोल 101.39 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.57 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल भाव 107.47 रुपये प्रति लीटरवर पोहोचला आहे.
4 दिवसांत डिझेल दरात 4 वेळा वाढ -
देशभरात मागील 4 दिवसांत डिझेल दरात 4 वेळा वाढ झाली आहे. या चार दिवसांत डिझेल दरात 95 पैसे प्रति लीटरने वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी नुकतंच 24 सप्टेंबर रोजी 20 पैसे, तर 26 सप्टेंबरला 25 पैसे वाढ केली होती. 27 सप्टेंबरला पुन्हा 25 पैशांची वाढ झाली. त्यानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी आज पुन्हा 25 पैशांची वाढ करण्यात आली. पेट्रोल दर मागील 22 दिवसांपासून स्थिर होता, परंतु आज पेट्रोल दरात पुन्हा वाढ झाली आहे.
चार महानगरातील पेट्रोल-डिझेल दर (Petrol Diesel Price on 28 September 2021) -
>> दिल्लीत पेट्रोल 101.39 रुपये आणि डिझेल 89.57 रुपये प्रति लीटर
>> मुंबईत पेट्रोल 107.47 रुपये आणि डिझेल 97.21 रुपये प्रति लीटर
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 99.15 रुपये आणि डिझेल 94.17 रुपये प्रति लीटर
>> कोलकातामध्ये पेट्रोल 101.87 रुपये आणि डिझेल 92.67 रुपये प्रति लीटर
भारीच आहे! 35 व्या वर्षी 10 कोटींची सेव्हिंग; महिलेची आयडिया पाहून अवाक् व्हाल!
देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike, Petrol price hike