Home /News /money /

खिशाला परवडत नाहीये Petrol Price? अशाप्रकारे मोफत मिळेल 71 लीटर इंधन, वाचा सविस्तर

खिशाला परवडत नाहीये Petrol Price? अशाप्रकारे मोफत मिळेल 71 लीटर इंधन, वाचा सविस्तर

सध्या न परवडणारं पेट्रोल-डिझेल विकत घेताना इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्ड (Indian Oil Citi Credit Card) तुमच्या फायद्याचे ठरेल. या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला दरवर्षी 71 लीटरपर्यंत पेट्रोल-डिझेल मोफत (Free Petrol Diesel) मिळू शकेल.

पुढे वाचा ...
    मुंबई, 05 जानेवारी: पेट्रोल-डिझेलचे भाव सध्या सामान्यांच्या (Petrol Diesel Prices) आवाक्याबाहेरचे आहेत. उत्पादन शुल्क कमी होऊनही (Excise Duty Cut) इंधनाचे दर अवकाशाला भिडले आहेत. अशावेळी पेट्रोल-डिझेल विकत घेताना इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्ड (Indian Oil Citi Credit Card) तुमच्या फायद्याचे ठरेल. या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला दरवर्षी 71 लीटरपर्यंत पेट्रोल-डिझेल मोफत (Free Petrol Diesel) मिळू शकेल. वेगवेगळ्या कंपन्यांची क्रेडिट कार्ड्स ग्राहकांना त्यांनी जमवलेले रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याचे वेगवेगळे पर्याय देतात. तुम्ही IRCTC को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवर जमा केलेले रिवॉर्ड पॉइंट रिडीम करून ट्रेन तिकीट बुक करू शकता. काही क्रेडिट कार्ड फ्यूल रिटेलर्ससह को-ब्रँडिंग करुन जारी केले जातात आणि त्यात रिवॉर्ड पॉइंट्सच्या बदल्यात पेट्रोल-डिझेल ऑफर केले जाते. हे वाचा-मुलींच्या भविष्यासाठी करा बचत, 18 वर्षाची होताच मिळतील 65 लाख! इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्ड हे असे कार्ड आहे ज्यावर ग्राहकांना मिळवलेल्या पॉइंट्सच्या (Buy petrol using reward points) बदल्यात पेट्रोल आणि डिझेल मिळते. या कार्डचा वापर करून मिळवलेले रिवॉर्ड पॉइंट्स (टर्बो पॉइंट्स) रिडीम करून, ग्राहक दरवर्षी 71 लीटरपर्यंत पेट्रोल आणि डिझेल खरेदी करू शकतात. अर्थात ही खरेदी करताना तुमच्याकडे जमा झालेले रिवॉर्ड पॉइंट्स खर्च होतात, तुम्हाला नवीन रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये 1. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर टर्बो पॉइंट्स रीडिम करून वार्षिक 71 लीटरपर्यंत पेट्रोल फ्री 2. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर 1 टक्का फ्यूअल सरचार्ज माफ 3. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर प्रति 150 रुपयांच्या खर्चावर 4 टर्बो पॉइंट्स मिळतील 4. या कार्डच्या माध्यमातून ग्रोसरी किंवा सुपरमार्केटमध्ये शॉपिंग केल्यास प्रत्येक 150 रुपयांच्या खर्चावर 2 टर्बो पॉइंट्स मिळतील 5. कार्डच्या माध्यातून अन्य कॅटेगरीसाठी प्रति 150 रुपयांच्या स्पेंडिंगवर 1 टर्बो पॉइंट मिळेल हे वाचा-मार्च 2022 पूर्वी पूर्ण करा ही 7 कामं, डेडलाइन मिस झाल्यास होईल मोठं नुकसान कशाप्रकारे रीडिम कराल टर्बो पॉइंट टर्बो पॉइंट्स विविध प्रकारे रीडिम करता येतील मात्र तुम्ही हे इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर हे पॉइंट्स रीडिम केल्यास अधिक फायद्याचे ठरेल >> इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर रिडम्पशन रेट- 1 टर्बो पॉइंट = 1 रुपये >> goibibo.com, IndiGo, Make My Trip, yatra.com वर रिडम्पशन रेट- 1 टर्बो पॉइंट = 25 पैसे >> Book my Show, Vodafone वर रिडम्पशन रेट- 1 टर्बो पॉइंट = 30 पैसे ग्राहकांना आणखी काय फायदे मिळतील? इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्डवर 71 लीटरपर्यंत इंधन मोफत मिळण्यासह इतरही काही फायदे मिळतात. जाणून घ्या काय आहेत या कार्डवर मिळणारे इतर फायदे- >> वार्षिक 30 हजार रुपये खर्च केल्यास 1000 रुपये अॅन्युअल फी माफ करण्यात आली आहे. >> कार्ड सक्रिय केल्यावर, तुम्हाला रु. 250 किमतीचे टर्बो पॉइंट्स मिळतील. >> याशिवाय 3650 रुपयांचे अतिरिक्त पॉइंट्सही उपलब्ध आहेत. >> तुम्ही या कार्डद्वारे संपर्करहित पेमेंट करू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या