Home /News /money /

मार्च 2022 पूर्वी पूर्ण करा ही 7 कामं, डेडलाइन मिस झाल्यास होईल मोठं नुकसान

मार्च 2022 पूर्वी पूर्ण करा ही 7 कामं, डेडलाइन मिस झाल्यास होईल मोठं नुकसान

वर्षातील मार्चचा महिना (March 2022 deadline for big tasks) हा नेहमीच महत्त्वाचा मानला जातो, कारण या महिन्याच्या शेवटच्या तारखेला आर्थिक वर्ष संपते. हा महिना संपण्याापूर्वी अशी अनेक महत्त्वाची कामे करण्याची गरज आहे, ज्यांची अंतिम मुदत 31 मार्च आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 05 जानेवारी: वर्षातील मार्चचा महिना (March 2022 deadline for big tasks) हा नेहमीच महत्त्वाचा मानला जातो, कारण या महिन्याच्या शेवटच्या तारखेला आर्थिक वर्ष संपते. हा महिना संपण्याापूर्वी अशी अनेक महत्त्वाची कामे करण्याची गरज आहे, ज्यांची अंतिम मुदत 31 मार्च आहे. दिलेल्या मुदतीपूर्वी ही कामे पूर्ण न केल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो. केंद्र सरकारने विविध योजना, कामांसाठी अंतिम मुदत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. चला तर मग जाणून घेऊया 31 मार्चपूर्वी कोणती कामे करणे आवश्यक आहे. 1. आयटीआर व्हेरिफाय करा ज्या करदात्यांनी अद्याप 2019-20 या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या इन्कम टॅक्स रिटर्नचे  (Income Tax Return) ई-व्हेरिफिकेशन  (itr verification date) केले नाही, ते करदाते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यांच्या आयटीआर (ITR )चे ई-व्हेरिफिकेशन करू शकतात. 2. हयातीचा दाखला देणे सरकारने पेन्शनधारकांसाठी हयातीचा दाखला (life certificate for pensioners) बँकेत सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 वरून 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. आता पेन्शनधारक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यांचा  हयातीचा दाखला सादर करू शकतात. देशभरातील पेन्शनधारकांसाठी त्यांची पेन्शन कोणत्याही अडथळ्याशिवाय किंवा ब्रेकशिवाय मिळवण्‍यासाठी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. हे वाचा-Petrol Diesel: महाराष्ट्रात काय आहे इंधन दर? या शहरात सर्वाधिक महाग आहे पेट्रोल 3. आर्थिक वर्ष 2020-21 साठी अग्रिम टॅक्स भरण्याची शेवटची तारीख आर्थिक वर्ष 2021-22 साठी अग्रिम टॅक्स भरण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2022 आहे. जर तुम्ही इन्कम टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असाल, तर तुम्हाला तुमचा टॅक्स वेळेवर भरावा लागतो.  तसेच जर एखाद्या व्यक्तीने या तारखेपर्यंत अॅडव्हान्स टॅक्स भरला नाही, तर कलम  234 ए /234 बी अंतर्गत व्याज लागू होईल. ज्येष्ठ नागरिकांना अग्रिम टॅक्स भरण्यापासून सूट आहे. 4. आधारशी पॅन लिंक करा जर तुम्ही अद्याप तुमच्या आधार क्रमांकाशी पॅन लिंक केले नसेल ( PAN Aadhaar liking deadline ), तर तुम्ही हे काम 31 मार्च 2022 पूर्वी करणे आवश्यक आहे. या तारखेपर्यंत तुमचा पॅन तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केला नाही, तर तुमचा पॅन निष्क्रिय होईलच, तसेच तुम्हाला 1,000 रुपये दंडही भरावा लागेल. हे वाचा-अर्थसंकल्पासंबंधी देश स्वतंत्र झाल्यापासून ते आजवरच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी 5. बिलेटेड आयटीआर फाइलिंग 2020-21 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजेच आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 होती, जी आता संपली आहे. ज्यांची 31 डिसेंबरची अंतिम मुदत चुकली आहे, ते अजूनही विलंब शुल्कासह आयटीआर भरू शकतात. आर्थिक वर्षासाठी आयटीआर भरण्याची मूळ मुदत संपल्यानंतर, बिलेटेड रिटर्न भरण्याची संधी असते, परंतु यासाठी दंड आकारला जातो. आर्थिक वर्ष 2020-21 साठी बिलेटेड आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 आहे.आयटीआर उशीरा भरल्यामुळे 5,000 रुपये दंड आकारला जाईल. 6. टॅक्स सेव्हिंग केल्याची खात्री करा तुम्ही आर्थिक वर्ष 2021-22 साठी जुन्या टॅक्स प्रणालीची निवड केली असल्यास, तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत तुमचा टॅक्स सेव्हिंग पर्यायाचा फायदा घेऊ शकता. सर्व सेक्शनच्या अंतर्गत असणाऱ्या टॅक्स डिडक्शन सुविधेचा लाभ घेतला आहे, याची खात्री करदात्यांना करावी लागेल. नियमानुसार, कलम 80 सी मध्ये 1.5 लाखांपर्यंत, एनपीएस योगदानासाठी कलम 80 सीसीडी (1बी) अंतर्गत  50,000 रुपयांपर्यंत , वैद्यकीय विमा प्रीमियम वर  50,000 रुपये टॅक्स लाभ मिळतो. हे वाचा-634 रुपयात मिळेल हा LPG सिलेंडर, नेण्या-आणण्यासही आहे सोपा; वाचा सविस्तर 7. बँक केवायसी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 ऐवजी  31 मार्च 2022 केली आहे. केवायसी अंतर्गत, बँक ग्राहकांना त्यांचे पॅन कार्ड, आधार, पासपोर्ट इत्यादी अपडेट करण्यास सांगते. यासोबतच अलीकडचा पासपोर्ट फोटो आणि इतर माहितीही घेतली जाते. मार्च महिना संपण्यापूर्वी प्राधान्याने कोणकोणती कामे करण्याची गरज आहे, याचे नियोजन करा. जेणेकरून तुमचे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकेल.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Bank details, Financial need, Income tax, Money

पुढील बातम्या