• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Petrol Price Today: याठिकाणी 3 रुपये प्रति लीटरनं स्वस्त झालं पेट्रोल, काय आहेत आजचे दर

Petrol Price Today: याठिकाणी 3 रुपये प्रति लीटरनं स्वस्त झालं पेट्रोल, काय आहेत आजचे दर

Petrol-Diesel Price Today: आज सलग 29व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही आहेत. जाणून घ्या महत्त्वाच्या शहरात काय आहेत इंधनाचे दर

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 ऑगस्ट: सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price Today) जारी केले आहेत. आज 15 ऑगस्ट रोजी देखील इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. आज सलग 29व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही आहेत. संपूर्ण देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर आसमंताला भिडलेले असताना तमिळनाडूमध्ये ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तमिळनाडू राज्य सरकारने यावर लागणाऱ्या टॅक्सवर 3 रुपये प्रति लीटरची कपात केली आहे. तमिळनाडूचे अर्थमंत्री पी त्याग राजनने राज्याच्या अर्थसंकल्पात या कपातीची घोषणा केली आहे. तमिळनाडू सरकारने उचललेल्या या पावलानंतर दुसऱ्या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर लागणारा टॅक्स कमी होण्याची शक्यता आहे. IOCL च्या वेबसाइटनुसार, मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 107.83 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 97.45 रुपये प्रति लीटर आहेत. मे महिन्यानंतर सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर आता 29 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे  स्थिर आहेत. त्याआधी 42 दिवस झालेल्या इंधनवाढीबाबत बोलायचे झाले कर, पेट्रोल जवळपास 11.52 रुपये प्रति लीटरने महागले होते. तर डिझेल 9.08 रुपये प्रति लीटरने महागले होते. हे वाचा-बँक FD, PF, PPF, SIP, NPS मध्ये गुंतवणूक करताय? वाचा कधी होतील पैसे तिप्पट जुलैमध्ये शेवटचे बदलले होते दर 18 जुलैपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. शेवटी पेट्रोलचे दर 17 जुलै रोजी वधारले होते. 17 जुलै रोजी पेट्रोलच्या दरात 30 पैशांची वाढ पाहायला मिळाली होती, तर डिझेलचे दर स्थिर होते. पेट्रोल-डिझेलचे आजचे दर >> दिल्ली - पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर >> मुंबई - पेट्रोल 107.83 रुपये और डीजल 97.45 रुपये प्रति लीटर >> चेन्नई - पेट्रोल 101.49 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर >> कोलकाता - पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लीटर >> भोपाळ - पेट्रोल 110.20 रुपये आणि डिझेल 98.67 रुपये प्रति लीटर >> बंगळुरु - पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लीटर >> लखनऊ -पेट्रोल 98.92 रुपये आणि डिझेल 90.26 रुपये प्रति लीटर >> पाटणा - पेट्रोल 104.25 रुपये आणि डिझेल 95.57 रुपये प्रति लीटर >> जयपूर - पेट्रोल 108.71 रुपये आणि डिझेल 99.02 रुपये प्रति लीटर >> गुरुग्राम - पेट्रोल 99.46 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लीटर हे वाचा-Smartphone वापरताना तुम्ही या चुका करत असाल तर सावधान! फोन खराब होण्याचा धोका दररोज सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: