जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Petrol Diesel Prices: महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काय झाला बदल? एका क्लिकवर जाणून घ्या दर

Petrol Diesel Prices: महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काय झाला बदल? एका क्लिकवर जाणून घ्या दर

Petrol Diesel Prices: महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काय झाला बदल? एका क्लिकवर जाणून घ्या दर

Petrol Diesel Rates Today 1 April: सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या थेट वाढीनंतर आज काहीसा दिलासा ग्राहकांना मिळाला आहे. आज इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 एप्रिल: सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Rates Today on 01st April) दर जारी केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या थेट वाढीनंतर आज काहीसा दिलासा ग्राहकांना मिळाला आहे. इंधनाच्या दरात आज पुणे-मुंबईसह देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आज कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी गेल्या 10 दिवसात पेट्रोलच्या दरात 6.40 रुपयांची वाढ केली आहे, तर डिझेलच्या किमतीही साधारण एवढ्याच वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसात दररोज साधारण 80 पैशांनी इंधनाचे दर वाढत होते. देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Petrol Diesel Price in Delhi) आज पेट्रोलचे दर 102 रुपये प्रति लीटरच्या आसपास आहेत आहेत, मुंबईत पेट्रोल 117 रुपये (Petrol Diesel Price in Mumbai)  प्रति लीटरच्या जवळ पोहोचले आहेत. तर डिझेल 100 रुपये लीटरपेक्षा जास्त आहे. पुण्यामध्ये (Petrol Diesel Price in Pune) पेट्रोल 116.20 रुपये दर डिझेल 98.94 प्रति लीटरवर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये काही प्रमाणात इंधन दर कमी-जास्त झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यात सर्वाधिक पेट्रोलचे दर परभणी या शहरामध्ये आहेत. जाणून घ्या राज्यातील काही महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर हे वाचा- 1 एप्रिलपासून महागाईचा बोजा वाढणार; टीव्ही, AC, फ्रीज आणि मोबाइल सेवेसाठीही लागणार जास्त पैसे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये इंधनाचे दर

शहरपेट्रोलचा भाव (प्रति लीटर)डिझेलचा भाव (प्रति लीटर)
पुणे116.20 रुपये98.94 रुपये
मुंबई116.72 रुपये100.94 रुपये
नाशिक117.07 रुपये99.78 रुपये
नागपूर116.40 रुपये99.17 रुपये
अहमदनगर116.64 रुपये99.37 रुपये
औरंगाबाद117.36 रुपये100.06 रुपये
रत्नागिरी117.61 रुपये100.27 रुपये
रायगड116.23 रुपये98.94 रुपये
परभणी119.76 रुपये102.37 रुपये
पालघर116.43 रुपये99.13 रुपये
सांगली116.34 रुपये99.10 रुपये
कोल्हापूर116.77 रुपये99.51 रुपये

अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (How to check diesel petrol price daily) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात. हे वाचा- 1 लाख रुपयांचे झाले 3 कोटी रुपये, 8 वर्षांत 35 हजार टक्क्यांहून अधिक रिटर्न देणारा शेअर दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात