मुंबई, 30 मार्च : गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणुकीचं प्रमाण वाढलंय. शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीची असते. परंतु, कोरोनाकाळात शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करण्यात मध्यमवर्गीयांचं प्रमाण बरंच वाढलंय. त्यातच मागील काही देशांतर्गत वर्ष शेअर बाजारसाठी चांगले राहिलेत. या काळात बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टीने (NSE Nifty) 100 टक्क्यांहून अधिकची उसळी नोंदवली आहे. एकेकाळी निफ्टीला 18 हजार अंकांची पातळी अशक्य वाटत होती, पण निफ्टीने हा उच्चांकही ओलांडला. केवळ शेअर मार्केटसाठीच अच्छे दिन आले नाहीत, तर अनेकांच्या शेअर्सच्या किमतीमध्येही वाढ पाहायला मिळाली आहे. आज आपण ज्या पेनी स्टॉक Tanla Platforms बद्दल बोलणार आहोत. या कंपनीच्या शेअर्सने गेल्या 8 वर्षात 35 हजार टक्क्यांहून अधिक रिटर्न देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. ज्या गुंतवणुकदारांनी या शेअर्समध्ये त्यावेळी फक्त 1 लाख रुपये गुंतवले होते ते आज या स्टॉकमुळे करोडपती झाले आहेत. आजतकने या संदर्भात वृत्त दिलंय. हैदराबादमधील क्लाउड कॉम्प्युटिंग कंपनी Tanla Platforms पूर्वी Tanla Solutions म्हणून ओळखली जात होती. आठ वर्षांपूर्वी 28 मार्च 2014 रोजी त्यांच्या स्टॉकची किंमत फक्त 4.31 रुपये होती. आता त्याची किंमत 1,321.30 रुपये झाली आहे. गेल्या आठ वर्षांत या स्टॉकच्या किमतीत 30,556 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजार विश्लेषकांच्या मते कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत वाढीची शक्यता नाकारता येत नाही. कंपनीचे ग्राहक वाढत असल्याने कमाईतही सातत्याने वाढ होत आहे. कंपनीच्या सेवा एंटरप्राइझ मेसेजिंगचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे येत्या काळात या स्टॉकच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. आठ वर्षांपूर्वी ज्यांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांचे आता तीन कोटींपेक्षा अधिक पैसे झाले आहेत. EPFO अकाउंट असणाऱ्यांनी 31 मार्चपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा करावा लागेल पश्चाताप कंपनीचे आर्थिक निकाल पाहिल्यास इथेही त्यांची चांगली कामगिरी दिसून येते. 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने 356.14 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. तर, त्याच्या आधीच्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 209.48 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. या कालावधीत कंपनीची एकूण विक्री 20 टक्क्यांनी वाढून 2,341.47 कोटी रुपये झाली होती. गेल्या 10 वर्षांमध्ये कंपनीच्या विक्रीतील वार्षिक सरासरी वाढ तब्बल 30 टक्के राहिली आहे. ब्रोकरेज फर्म बोनान्झा पोर्टफोलिओचे (Bonanza Portfolio) रिसर्च हेड विशाल वाघ यांना स्टॉककडून खूप शक्यता दिसतात. त्यांनी या स्टॉकसाठी 1,907 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जर, विशाल वाघ यांचा हा अंदाज खरा ठरला तर येत्या काळात तन्ला प्लॅटफॉर्मचा स्टॉक 44 टक्क्यांहून अधिक वाढू शकतो. IIFL सिक्युरिटीजच्या मते, कंपनीचे सध्या 300 मिलियनहून अधिक सक्रिय मंथली युजर आहेत. या ब्रोकरेज फर्मने स्टॉकला 2,123 रुपयांची टार्गेट किंमत दिली आहे. म्हणजेच येत्या काळात याची किंमत 60 टक्क्यांहून अधिक वाढू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.