जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 1 एप्रिलपासून महागाईचा बोजा वाढणार; टीव्ही, AC, फ्रीज आणि मोबाइल सेवेसाठीही लागणार जास्त पैसे

1 एप्रिलपासून महागाईचा बोजा वाढणार; टीव्ही, AC, फ्रीज आणि मोबाइल सेवेसाठीही लागणार जास्त पैसे

1 एप्रिलपासून महागाईचा बोजा वाढणार; टीव्ही, AC, फ्रीज आणि मोबाइल सेवेसाठीही लागणार जास्त पैसे

Inflation Rate : सामान्य ग्राहकांवर या महागाईच्या कहराचा किती बोजा पडणार आणि तुमच्या घरचं बजेट कोलमडणार का?

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 31  मार्च: 2022-23 च्या बजेटमध्ये करण्यात आलेल्या काही तरतुदींमुळे 1 एप्रिलपासून ग्राहकांवरचा महागाईचा (Inflation) बोजा आणखी वाढणार आहे. उद्यापासून (1 एप्रिल) टीव्ही, एसी, फ्रीजसह मोबाइल वापरणंही महागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात (Budget) अनेक उत्पादनांवरच्या आयात शुल्कात (Import Duty) वाढ केली होती. तसंच काही उत्पादनांवरच्या शुल्कात कपातही केली होती. नवीन शुल्क 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यामुळे ज्या कच्च्या मालावरचं उत्पादन शुल्क वाढवण्यात आलं आहे, त्यांच्याशी संबंधित उत्पादनांच्या किमती वाढणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. या कारणामुळे वाढणार टीव्ही, एसी आणि फ्रीजच्या किमती सरकारने 1 एप्रिलपासून अ‍ॅल्युमिनियम धातूवर 30 टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. याचा वापर प्रामुख्याने टीव्ही (TV), एसी (AC), फ्रीज आणि हार्डवेअरमध्ये केला जातो. कच्च्या मालाचा पुरवठा महागल्यानं कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे आणि त्याचा थेट बोजा ग्राहकांवर पडणार आहे. याशिवाय कॉम्प्रेसरमध्ये वापरल्या जाणाऱ्या पार्ट्सवरचं आयात शुल्क वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे रेफ्रिजरेटरच्या (Refrigerator) किमती वाढणार आहेत. एलईडी बल्बच्या किमती वाढणार एलईडी बल्ब (LED Bulb) बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीवर 6 टक्के प्रतिपूर्ती शुल्कासह मूळ सीमाशुल्कही आकारलं जाईल, असं सरकारनं म्हटलं आहे. 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू झाल्यानंतर एलईडी बल्बही महाग होणार आहेत.

    वाचा - मास्क की No mask, Local प्रवासाचं काय, Gudi padwa कसा साजरा करायचा?; सर्व प्रश्नांची उत्तरं इथं पाहा

     सरकारने चांदीवरच्या (Silver) आयात शुल्कातही बदल केला आहे, त्यामुळे चांदीची भांडी आणि चांदीपासून बनवलेली उत्पादनं 1 एप्रिलनंतर महाग होणार आहेत. याशिवाय स्टीलच्या वस्तूंनाही महागाईचा फटका बसणार असून, उद्यापासून स्टीलची भांडीदेखील महागणार आहेत.

    मोबाइलमुळे वाढणार खर्च सरकारने मोबाइल फोन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रिंटेज सर्किट बोर्डवरही कस्टम ड्युटी अर्थात सीमा शुल्क लागू केलं आहे. म्हणजेच बाहेरून या उत्पादनांची आयात आता महाग होणार असून, त्याचा परिणाम कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार असून, मोबाइलच्या (Mobile) किमती वाढू शकतात, असं मत ग्रॅंट थ्रॉन्टन या अमेरिकी फर्मने व्यक्त केलं आहे. टेलिकॉम कंपन्याही देणार झटका आतापर्यंत ज्या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना मोफत अमर्याद डाटा आणि कॉलिंग सुविधा देत होत्या, त्या सेवा कंपन्यांकडून 31 मार्चला बंद करण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत 4G मार्केटमधल्या वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आता टॅरिफ प्लॅन निवडावा लागणार असून, यामुळे त्यांचा मोबाइल वापरण्याचा (Mobile Use) खर्चही वाढणार आहे. वायरलेस इअरबड्स आणि हेडफोनही महागणार वायरलेस इअरबड्समध्ये (Wireless Earbuds) वापरल्या जाणाऱ्या काही पार्ट्सच्या आयात शुल्कात सरकारने अर्थसंकल्पात वाढ केली आहे. त्यामुळे या वस्तूंचं उत्पादन महाग होणार आहे. वायरलेस इअरबड्स उत्पादक कंपन्या एप्रिलपासून त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे. याशिवाय, प्रीमियम हेडफोनच्या (Headphone) आयातीवर शुल्क वाढणार आहे. त्यामुळे 1 एप्रिलनंतर हेडफोनदेखील महागणार आहेत.

     हे वाचा- प्लास्टिकची रिकामी बाटली द्या अन् मोफत प्रवास करा! या सरकारकडून अनोखा उपक्रम

     अर्थसंकल्पात स्मार्टफोनशी संबंधित अनेक उत्पादनांवरचं आयात शुल्क कमी करण्यात आलं आहे. यात मोबाइल चार्जर, ट्रान्सफॉर्मर, कॅमेरा लेन्स मॉड्यूल यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. नवीन शुल्क लागू झाल्यानंतर संबंधित उत्पादनांच्या किमती कमी होऊ शकतात. सरकारने स्मार्टवॉच (Smartwatch) आणि फिटनेस बॅंडच्या (Fitness Band) काही पार्ट्सवरच्या उत्पादन शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे एप्रिलपासून ही उत्पादनं काहीशी स्वस्त होऊ शकतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात