नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेल दरात (Petrol Diesel Prices Today) कोणतेही बदल केलेले नाहीत. आज जारी करण्यात आलेले दर मागील तीन महिन्यांहून अधिक काळ स्थिर आहेत. परंतु नोएडा, गुरुग्राम, लखनऊ, पटनासह काही शहरांत पेट्रोल-डिझेल दरात काहीसा बदल झाला आहे. देशातील चार महानगर दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईमध्ये इंधन दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलचा सर्वाधिक दर मुंबईत 110 रुपयांजवळ आहे. तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबरपासून किंमतीत बदल केलेले नाहीत. या चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर – दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर – मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर – चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर
हे वाचा - e-RUPI | ई-रुपयाची मर्यादा वाढवली, काय होईल फायदा?
असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. सरकारने 15 जून 2017 पासून तेलाच्या किंमती बाजारा अधीन केल्या होत्या. त्यामुळे इंधन दर रोजच ठरू लागला. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.
हे वाचा - Tata Group साम्राज्यातील कंपन्यांची संपूर्ण लिस्ट, अनेक कंपन्या माहितही नसतील
पुणे | 109.45 रुपये | 92.25 रुपये |
---|---|---|
मुंबई | 109.98 रुपये | 94.14 रुपये |
नाशिक | 109.49 रुपये | 92.29 रुपये |
नागपूर | 109.71 रुपये | 92.53 रुपये |
अहमदनगर | 110.15 रुपये | 92.92 रुपये |
औरंगाबाद | 110.38 रुपये | 93.14 रुपये |
रत्नागिरी | 110.97 रुपये | 93.68 रुपये |
रायगड | 109.48 रुपये | 92.25 रुपये |
परभणी | 112.49 रुपये | 95.17 रुपये |
पालघर | 109.75 रुपये | 92.51 रुपये |
सांगली | 110.03 रुपये | 92.83 रुपये |
कोल्हापूर | 110.09 रुपये | 92.89 रुपये |
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या (Crude Oil) किंमती रेकॉर्ड स्तरावर आहेत. क्रूड ऑइल 93 डॉलर प्रति बॅरलने महागलं आहे. कच्च्या तेलाचा हा दर गेल्या सात वर्षांतील उच्चांक आहे. त्यात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. मागणीपेक्षा कमी जागतिक पुरवठा, रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधील वाढता तणाव आणि अमेरिकेतील खराब हवामान यामुळे क्रूडच्या किमती सातत्याने वाढत आहेत. परंतु क्रूड ऑइलचा दर वाढता असताना पेट्रोल-डिझेलचा भाव मागील तीन महिन्यांपासून स्थिर आहे.