मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Tata Group च्या साम्राज्यातील कंपन्यांची लिस्ट; काही कंपन्या अनेकांना माहितही नसतील

Tata Group च्या साम्राज्यातील कंपन्यांची लिस्ट; काही कंपन्या अनेकांना माहितही नसतील

टाटा ग्रुपमध्ये (Tata Group) अशा कंपन्या आहेत, ज्याबद्दल लोकांना आजही माहिती नाही. टाटा समूहाच्या जवळपास 10 क्षेत्रात 33 कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या यादीवर एक नजर टाकूया.

टाटा ग्रुपमध्ये (Tata Group) अशा कंपन्या आहेत, ज्याबद्दल लोकांना आजही माहिती नाही. टाटा समूहाच्या जवळपास 10 क्षेत्रात 33 कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या यादीवर एक नजर टाकूया.

टाटा ग्रुपमध्ये (Tata Group) अशा कंपन्या आहेत, ज्याबद्दल लोकांना आजही माहिती नाही. टाटा समूहाच्या जवळपास 10 क्षेत्रात 33 कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या यादीवर एक नजर टाकूया.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 10 फेब्रुवारी : तब्बल सात दशकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एअर इंडिया टाटा ग्रुपमध्ये परतली आहे. एअर इंडिया जानेवारी 2022 च्या शेवटच्या आठवड्यात ऑफिशियली टाटा ग्रुपमध्ये सामील झाली आहे. ज्याचे एअर इंडियाने जोरदार स्वागत केले आहे. एअर इंडियाच्या पुनरागमनासह, टाटा समूहाने प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. कंपनीकडे आधीपासूनच इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL), AirAsia (इंडिया) आणि विस्तारा (Vistara) आहेत.

टाटा ग्रुप देशातील मोठ्या बिझनेस ग्रुपपैकी एक आहे. 1868 मध्ये जमशेटजी टाटा यांनी त्याची स्थापना केली होती. या समूहात कंपन्यांची मोठी यादी आहे. तरीही या ग्रुपमध्ये अशा कंपन्या आहेत, ज्याबद्दल लोकांना आजही माहिती नाही. टाटा समूहाच्या जवळपास 10 क्षेत्रात 33 कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या यादीवर एक नजर टाकूया.

माहिती तंत्रज्ञान, स्टील आणि ऑटोमोबाइल (IT, Steel & Automobile)

ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये टाटा समुहाने टाटा मोटर्स (Tata Motors), जग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover) आणि टाटा ऑटोकॉम्प सिस्टम (Tata AutoComp systems) आपलं स्थान भक्कम केलं आहे. तर आईटी सेक्टरमध्ये कंपनीकडे टाटा कन्सलटन्सी सर्विसेज (Tata Consultancy Services -TCS) सारखी दिग्गज कंपनी आहे. जी आईटी सेक्टरमधील ग्लोबल कंपनी आहे. टाटाकडे डिजाइन, टेक्नोलॉजी आणि डिजिटल बिजनेससाठी टाटा एलेक्सी (Tata Elxsi) आणि टाटा डिजिटल (Tata Digital) सारख्या कंपन्या आहेत. टाटा ग्रुपच्या स्टील कंपन्यांवर नजर टाकली तर या क्षेत्रात 1907मध्ये एन्ट्री केली.

एरोस्पेस आणि इन्फ्रास्ट्रक्चर

एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगांमध्ये, टाटा समूहाची टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (Tata Advance System Ltd) आहे, जी 2007 मध्ये स्थापन झाली होती. त्याचप्रमाणे पायाभूत सुविधांमध्ये टाटा पॉवर ही समूहाची सर्वात मोठी वीज कंपनी आहे. याशिवाय कंपनीकडे टाटा हाऊसिंग (Tata Housing), टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स (Tata Consulting Engineers), टाटा प्रोजेक्ट्स (Tata Projects) आणि टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Tata Realty and Infrasructure ltd) सारख्या कंपन्या देखील आहेत.

दूरसंचार आणि रिटेल आणि ग्राहक (Telecom and Retail & Consumer)

रिटेल आणि ग्राहक उद्योगात (retail and consumer industry), टाटा समूहात टाटा केमिकल्स (Tata Chemicals), टाटा ग्राहक उत्पादने (Tata Consumer Products), टायटन कंपनी (Titan Company), व्होल्टास (Voltas), ट्रेंट आणि इन्फिनिटी रिटेल (Voltas, Trent and Infiniti Retail ) आहेत. समूहाने टाटा कम्युनिकेशन्स (Tata Communication), टाटा प्ले (Tata Play) आणि टाटा टेलिसर्व्हिसेसच्या (Tata Teleservices) माध्यमातून दूरसंचार क्षेत्र आणि मीडिया उद्योगात आपले पंख पसरवले आहेत.

आर्थिक सेवा, व्यापार आणि गुंतवणूक (Financial Services, Trading & Investment)

आर्थिक क्षेत्रावर नजर टाकली तर समूहात टाटा कॅपिटल (Tata Capital), टाटा एआयए लाइफ (Tata AIA Life), टाटा एआयजी (Tata AIG) आणि टाटा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (Tata Asset management Company) यासारख्या कंपन्या आहेत. व्यापार आणि गुंतवणुकीत, समूहाची मालकी टाटा इंडस्ट्रीज (Tata industries), टाटा इंटरनॅशनल (Tata International) आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (Tata Investment Corporation) आहे. याशिवाय अनेक विदेशी ब्रँड्स आहेत ज्यात टाटा समूहाची मालकी आहे. ज्यामध्ये Starbucks India, Tetley, Corus Group, Daewoo Commercial Vehicles, General Chemical Products आणि Tyco Global Network इत्यादींचा समावेश आहे. हुह.

First published:

Tags: Ratan tata, Tata group