• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Ration Card : तुम्हालाही मिळत असेल कमी धान्य, तर या नंबरवर कॉल करून लगेच करा तक्रार

Ration Card : तुम्हालाही मिळत असेल कमी धान्य, तर या नंबरवर कॉल करून लगेच करा तक्रार

Ration Card: शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी राज्यवार हेल्पलाइन क्रमांक (Helpline number) जारी केले आहेत. तुम्हालाही कमी रेशन मिळत असेल, तर तुम्ही या क्रमांकांवर संपर्क साधून संबंधित दुकानदाराविरुद्ध तक्रार नोंदवू शकता.

  • Share this:
    नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर : शिधापत्रिका (Ration Card) हे असं महत्त्वाचं कागदपत्र (डॉक्युमेंट) आहे, ज्याद्वारे तुम्हाला स्वस्तात रेशन मिळते. अनेक वेळा आपण पाहतो की रेशन दुकानदार शिधापत्रिकाधारकांना रेशन देण्यास नकार देतात किंवा वजन करून कमी रेशन देतात. असं काही तुमच्या बाबतीत घडलं तर अजिबात काळजी करू नका. शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी राज्यवार हेल्पलाइन क्रमांक (Helpline number) जारी केले आहेत. तुम्हालाही कमी रेशन मिळत असेल, तर तुम्ही या क्रमांकांवर संपर्क साधून संबंधित दुकानदाराविरुद्ध तक्रार नोंदवू शकता. सरकारनं भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि अन्नधान्याचं वितरण सुनिश्चित करण्यासाठी तक्रार हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. जेणेकरून, अनुदानित रेशन गरिबांपर्यंत पोहोचेल. जर कोणत्याही शिधापत्रिकाधारकाला त्यांचा अन्न कोटा मिळत नसेल, तर ते टोल फ्री हेल्पलाइन नंबरवर कॉल करून त्यांची तक्रार नोंदवू शकतात. या लिंकला भेट द्या तुमच्या राज्याच्या टोल फ्री क्रमांक राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलच्या https://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या लिंकला भेट देऊन तुम्ही सर्व राज्यांचे नंबर काढू शकता. शिधापत्रिकेसाठी अर्ज करूनही अनेकांना अनेक महिने शिधापत्रिका मिळत नसल्याचं अनेकदा दिसून आलंय. अशा परिस्थितीत, ती व्यक्ती याद्वारे सहजपणे तक्रार करू शकते. हे वाचा - भल्यामोठ्या कोब्राला हातात घेऊन तरुणाचा डान्स; VIDEO पाहून डोळ्यांवर नाही बसणार विश्वास येथे राज्यनिहाय तक्रार हेल्पलाइन क्रमांक तपासा आंध्र प्रदेश – 1800-425-2977 अरुणाचल प्रदेश – 03602244290 आसाम - 1800-345-3611 बिहार- 1800-3456-194 छत्तीसगड- 1800-233-3663 गोवा- 1800-233-0022 गुजरात- 1800-233-5500 हरियाणा – 1800-180-2087 हिमाचल प्रदेश – 1800-180-8026 झारखंड - 1800-345-6598, 1800-212-5512 कर्नाटक- 1800-425-9339 केरळ- 1800-425-1550 मध्य प्रदेश - 181 महाराष्ट्र- 1800-22-4950 मणिपूर- 1800-345-3821 मेघालय- 1800-345-3670 मिझोरम- 1860-222-222-789, 1800-345-3891 नागालँड - 1800-345-3704, 1800-345-3705 ओडिशा - 1800-345-6724 / 6760 पंजाब – 1800-3006-1313 राजस्थान – 1800-180-6127 सिक्कीम – 1800-345-3236 तामिळनाडू – 1800-425-5901 तेलंगणा – 1800-4250-0333 त्रिपुरा- 1800-345-3665 उत्तर प्रदेश- 1800-180-0150 उत्तराखंड – 1800-180-2000, 1800-180-4188 पश्चिम बंगाल – 1800-345-5505 दिल्ली – 1800-110-841 जम्मू – 1800-180-7106 काश्मीर – 1800-180-7011 अंदमान आणि निकोबार बेटे – 1800-343-3197 चंदीगड – 1800-180-2068 दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव - 1800-233-4004 लक्षद्वीप – 1800-425-3186 पुडुचेरी - 1800-425-1082 हे वाचा - Bhaubeej 2021 : कपड्यांच्या रंगापासून ओवाळतानाच्या दिशेपर्यंत बहिणींनी घ्यावी या गोष्टींची काळजी अशा प्रकारे रेशन कार्ड बनवता येते सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या संबंधित राज्याच्या अधिकृत साइटवर जावे लागेल. रेशनकार्ड मिळविण्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट हे ओळखपत्र म्हणून दिले जाऊ शकतात. जर हे कार्ड नसेल तर सरकारने दिलेले कोणतेही आय कार्ड, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स देता येते. रेशनकार्डसाठी अर्ज करताना तुम्हाला पाच ते ४५ रुपये द्यावे लागतील. अर्ज सादर केल्यानंतर, तो फील्ड सत्यापनासाठी पाठविला जातो. अधिकारी फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीची पडताळणी करतो.
    Published by:News18 Desk
    First published: