नवी दिल्ली, 22 जानेवारी: सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel) च्या किंमती पुन्हा एखदा वाढवल्या आहेत. या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांच्या समस्या आणखी वाढवणार आहेत. मुख्यत: डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतीचा परिणाम सामान्यांवर होणार आहे. अनेक राज्यांत डिझेलच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर आहेत. त्याचप्रमाणे गेल्या पाच महिन्यात दुसऱ्यांदा ट्रान्सपोर्टर्सनी देखील भाडं वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. याचा भार देखील सामान्यांवर पडणार आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचे आणि डिझेलचे दर 25 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत. मुंबईमध्ये देखील पेट्रोलचे दर 92 रुपये प्रति लीटरपेक्षा जास्त आहेत.
काहीशा ब्रेकनंतर डिझेलच्या किंमतीमध्ये गेल्या अडीच महिन्यात साधारण 5 रुपये प्रति लीटरने वाढ झाली आहे. आधीपासून जास्त किंमतीमुळे त्रस्त असणाऱ्या ट्रान्सपोर्टर्स देखील आता ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट 10 ते 15 टक्के वाढवण्याच्या विचारात आहेत. गेल्या 6 महिन्यातील ही दुसरी मोठी वाढ आहे. ट्रान्सपोर्टर्सच्या मते किंमतींमध्ये एवढी वाढ झाली तर ग्राहकांवर त्याचा भार टाकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही राहणार.
महानगरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती
-दिल्ली: पेट्रोल 85.45 रुपये आणि डिझेल 75.63 रुपये प्रति लीटर
-मुंबई: पेट्रोल 92.04 रुपये आणि डिझेल 82.40 रुपये प्रति लीटर
-कोलकाता: पेट्रोल 86.87 आणि डिझेल डीजल 79.23 रुपये प्रति लीटर
-चेन्नई: पेट्रोल 88.07 रुपये आणि डिझेल 80.90 रुपये प्रति लीटर
(हे वाचा-Budget 2021: करदात्यांना सरकारकडून मिळू शकतो झटका, टॅक्स स्लॅब बदलणार?)
-बेंगळुरु: पेट्रोल 88.33 रुपये आणि डिझेल 80.20 रुपये प्रति लीटर
-नोएडा: पेट्रोल 85.02 रुपये आणि डिझेल 76.08 रुपये प्रति लीटर
-गुरुग्राम: पेट्रोल 83.60 रुपये आणि डिझेल 76.23 रुपये प्रति लीटर
सामान्यांवर होणार असा परिणाम
डिझेलच्या किंमती आणखी वाढल्या तर सामान्यांच्या बजेटवर परिणाम होईल. महागणारे डिझेल आणि शेतकरी आंदोलनामुळे विविध भागांमध्ये वस्तूंचा पुरवठा कमी झाला आहे. दिल्लीमध्ये डिझेलच्या किंमती सर्वोच्च स्तरापेक्षा 7 पैशांनी कमी आहे, दिल्लीमध्ये हा सर्वोच्च स्तर डिझेलच्या किंमतींनी पार केला आहे.
कसे तपासाल पेट्रोल-डिझेलचे नवे दर
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
(हे वाचा-कबड्डी स्पर्धेदरम्यान दुर्घटना; मॅच सुरू असतानाच खेळाडूचा मृत्यू)
BPCL कस्टमर RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर तर एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.