मराठी बातम्या /बातम्या /मनी /Budget 2021: करदात्यांना सरकारकडून मिळू शकतो झटका, टॅक्स स्लॅब विनाबदल?

Budget 2021: करदात्यांना सरकारकडून मिळू शकतो झटका, टॅक्स स्लॅब विनाबदल?

यंदाच्या अर्थसंकल्पाकडे जनसामान्य अपेक्षेनं पाहत आहेत. करदात्यांचं काय होणार याची साहजिकच उत्सुकता आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पाकडे जनसामान्य अपेक्षेनं पाहत आहेत. करदात्यांचं काय होणार याची साहजिकच उत्सुकता आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पाकडे जनसामान्य अपेक्षेनं पाहत आहेत. करदात्यांचं काय होणार याची साहजिकच उत्सुकता आहे.

नवी दिल्ली, 22 जानेवारी: केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2021) सर्वसामान्यांसाठी दरवर्षी नव्या आशाआकांशा घेऊन येतो. करदात्यांना (Taxpayers) इनकम टॅक्स दरात  (Income Tax Rates) आणखी दिलासा मिळण्याची अपेक्षा असते. दुसरीकडे देशातल्या गोरगरीब लोकांना सरकारकडून आपल्यासाठी मोठ्या घोषणा होतील, अशी आशा असते. यंदाचा अर्थसंकल्प तर कोरोना संकटकाळाच्या पार्श्वभूमीवर सादर होतो आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून तर लोकांना खूप अपेक्षा आहेत.

पण या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून मध्यमवर्गीय कुटुंबांना झटका दिला जाऊ शकतो. अर्थमंत्री निर्मला सीतारमन (FM Nirmala Sitharaman) यावेळीही टॅक्स स्लॅब (Tax Slabs) मध्ये कोणतेच फेरबदल करणार नसल्याची चर्चा आहे.

CNBC-TV18 च्या मते, आर्थिक वर्ष 2021-22 साठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात वैयक्तिक मिळकतीच्या टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. अर्थ मंत्रालयाकडून (Ministry of Finance) करदात्यांना इतर मार्गानं इन्कम टॅक्समध्ये दिलासा देण्याच्या पर्यायांवर विचार केला जात आहे.

इतर पर्यायानुसार, अर्थ मंत्रालयात प्राप्तिकर कायदा (Income Tax Act) च्या कलम-80C अंतर्गत सवलतीची मर्यादा वाढवून देण्यावर गांभीर्यानं विचार सुरू आहे. सध्या सेक्शन-80C (Section 80C) च्या अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळते.

केंद्र सरकार 1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पातच सेक्शन-80C च्या अंतर्गत देण्यात येणारी सूट 1.5 लाख रुपयावरून वाढवून 2 लाख रुपये केली जाऊ शकते.

सध्याच्या टॅक्स स्लॅबनुसार, 2.5 ते 5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांकडून 5 टक्के टॅक्स घेतला जातो. 5 ते 10  लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांकडून 20 टक्के तर 10 लाख रुपयांहून जास्त उत्पन असणाऱ्यांना 30 टक्के टॅक्सची आकारणी केली जाते.

First published:

Tags: Budget 2021, Income tax