मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरामुळे सामान्यांच्या खिशाला चाप, आज 1 लीटरसाठी इतकी मोजावी लागेल किंमत

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरामुळे सामान्यांच्या खिशाला चाप, आज 1 लीटरसाठी इतकी मोजावी लागेल किंमत

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Fuel Price on 10th December) जारी केले आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. अर्थात पेट्रोल-डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 11 डिसेंबर: सामान्यांच्या खिशाला परवडणार नाहीत अशा पातळीवर पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price Today) दर पोहोचले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती जास्त असल्यामुळे त्याचा परिणाम इतर जीवनावश्यक गोष्टींच्या किमतीवर देखील होत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Fuel Price on 11th December) जारी केले आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. अर्थात पेट्रोल-डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. मुंबईच्या तुलनेत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी आहेत.

दिल्लीतील पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाली आहे कारण केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील वॅटमध्ये कपात (Kejriwal Government slashes vat on petrol) करण्यााच निर्णय घेतला. परिणामी दिल्लीत पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त झालं आहे. दिल्लीमध्ये 1 लीटर पेट्रोलचा भाव 95.41 रुपये प्रति लीटर आहे.

हे वाचा-Gold Price Today: चांदीमध्ये मोठी घसरण, सोन्याचे दर 47 हजारांपार

अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता.

हे वाचा-सामान्यांसाठी मोठी बातमी! वाढत्या महागाईत आणखी एक झटका,हॉस्पिटलमध्ये उपचार महागणार

इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.

आजचे इंधनाचे दर

शहरपेट्रोलचा भाव (प्रति लीटर)डिझेलचा भाव (प्रति लीटर)
दिल्ली95.41 रुपये86.67 रुपये
मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
चेन्नई101.40 रुपये91.43 रुपये
कोलकाता104.67 रुपये89.79 रुपये
श्रीगंगानगर114.01 रुपये98.39 रुपये
लखनऊ95.28 रुपये86.80 रुपये
पोर्ट ब्लेअर82.96 रुपये89.33 रुपये
गांधीनगर95.35 रुपये89.33 रुपये

दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते

First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise, Petrol price