मराठी बातम्या /बातम्या /मनी /सामान्यांसाठी मोठी बातमी! वाढत्या महागाईत आणखी एक झटका, हॉस्पिटलमध्ये उपचार महागणार

सामान्यांसाठी मोठी बातमी! वाढत्या महागाईत आणखी एक झटका, हॉस्पिटलमध्ये उपचार महागणार

Hospital Representative Image

Hospital Representative Image

देशभरातील खासगी रुग्णालयं उपचारांसाठीची रक्कम वाढवण्याच्या तयारीत (Private Hospitals rate hike) आहेत. माध्यमांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षीपासून मेडिकल ट्रीटमेंसाठीचा खर्च पाच ते 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 10 डिसेंबर: कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर लागू कऱण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आधीच सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं होतं. त्यातून सावरत नाही तोपर्यंत पेट्रोल-डिझेल, भाज्या, इंटरनेट अशा सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. मात्र, या सगळ्यातून दिलासा मिळण्याऐवजी आता त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. देशभरातील खासगी रुग्णालयं उपचारांसाठीची रक्कम वाढवण्याच्या तयारीत (Private Hospitals rate hike) आहेत. माध्यमांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षीपासून मेडिकल ट्रीटमेंसाठीचा खर्च पाच ते 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

    मेडिकल ट्रीटमेंटची दरवाढ (Medical treatment cost hike) करण्याबाबत अपोलो, फोर्टिस आणि अन्य खासगी रुग्णालये विचार करत आहेत. काही खासगी रुग्णालयांच्या अधिकाऱ्यांनी इकॉनॉमिक टाईम्सला याबाबत माहिती दिली. “2019 पासून कोरोनामुळे आम्ही मॅनपॉवर वाढवली आहे, तसेच ऑपरेटिंगचा खर्च देखील या काळात बराच वाढला आहे. असे असतानाही आम्ही गेल्या दोन वर्षांपासून रुग्णांकडून सामान्य दर आकारत होतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन, योग्य वेळी मेडिकल ट्रीटमेंट पॅकेजेसची सुधारित किंमत घोषित करू” असे फोर्टिस हेल्थकेअरच्या (Fortis Healthcare) प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

    हे वाचा-बिग बींच्या Duplex Flat मध्ये राहणार 'ही' अभिनेत्री, देणार इतकं लाख भाडं

    मीडिया अहवालानुसार, यासोबतच आणखी एका मोठ्या हॉस्पिटल चेनच्या (Private Hospital chains) अधिकाऱ्यांनीही असेच मत व्यक्त केले. कोलकातामधील मेडिका सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयाचे अध्यक्ष आलोक रॉय यांनीदेखील दरवाढ अटळ (Treatment cost hike inevitable) असल्याचे म्हटले आहे. अर्थात, किती टक्के दरवाढ करावी हा ज्या-त्या रुग्णालयाचा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रॉय हे फिक्की आरोग्य सेवा समितीचे अध्यक्ष आहेत. लाईव्ह हिंदुस्तानने याबाबतचे वृत्त दिले आहे.

    देशातील आणखी एक मोठी हॉस्पिटल चेन असलेल्या अपोलो हॉस्पिटल्सचे (Apollo hospitals) मुख्य आर्थिक अधिकारी कृष्णन अखिलेश्वरन यांनीही दरवाढीचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, “स्वच्छता, मनुष्यबळ, उपभोग्य वस्तू आणि महागाईमुळे आमचे मार्जिन कमी होत आहे. त्यामुळे कधी ना कधी आम्हाला ट्रीटमेंट रेट्स वाढवावेच लागणार आहेत. सामान्यतः दरवर्षी 5% दरवाढ ही होतच असते. मात्र, यावर्षी ती यापेक्षा जास्त होऊ शकते.”

    हे वाचा-बंपर रिटर्न! 10 रुपयांचा शेअर पोहोचला 338 रुपयांवर, 1 लाखाचे झाले 32 लाख

    फोर्टिस आणि अपोलोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही ग्रुप बिझनेस रिकव्हरी पासून 5-6 टक्के दूर आहेत. संपूर्ण रक्कम जमा करणारे रुग्ण, विमा कंपन्यांद्वारे ज्यांचा खर्च उचलला जातो असे रुग्ण आणि सरकारी सवलत मिळणारे रुग्ण – अशा तीन माध्यमांतून रुग्णालयांना पैसे मिळतात. यातील संपूर्ण रक्कम स्वतः जमा करणाऱ्या रुग्णांसाठीची मेडिकल ट्रीटमेंट कॉस्ट वाढवण्याचा विचार सध्या रुग्णालये करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

    त्यामुळे एकंदरीत एलपीजी, पेट्रोल, भाज्या, इंटरनेट या सर्व गोष्टींच्या दरवाढीखाली दबलेल्या सामान्यांवर आणखी एक बोजा पुढील वर्षी पडणार आहे. त्यामुळे येत्या वर्षात आजारी पडणं हे कोणत्याच दृष्टीने परवडणारं नाही.

    First published: