नवी दिल्ली, 10 डिसेंबर: भारतीय सराफा बाजारात आज 10 डिसेंबर 2021 रोजी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोन्याचा भाव 47 हजारांच्या पार (Gold Rate Today) पोहोचला आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. 10 डिसेंबर 2021 रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत 61 रुपयांची किरकोळ वाढ नोंदवली गेली. याशिवाय आज चांदीच्या दरात 651 रुपयांची मोठी घसरण झाली. याआधीच्या व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,952 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्याचवेळी चांदीचा भाव 59,888 रुपये प्रति किलोवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा भाव कमी झाला आहे. तर चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. जाणून घ्या आज सोन्याचा भाव किती आहे? दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 61 रुपयांची किरकोळ वाढ झाली. त्यानंतर राजधानी दिल्लीत सोन्याने 47 हजार रुपये प्रति तोळाचा दर पार केला आहे. आज दिल्ली सराफा बाजारात 99.9 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव 47,013 रुपये प्रति तोळावर बंद झाला आहे. दरम्यान आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव घसरला आणि दर 1,773 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. हे वाचा- Elon Musk यांनी टेस्लाचे 96.32 कोटी डॉलर्सचे शेअर्स विकले,आता शेअर खरेदीची तयारी आज किती आहे चांदीची किंमत? आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी चांदीचा भाव 615 रुपयांच्या घसरणीनंतर प्रति किलो 59,273 रुपयांवर बंद झाला आहे. तर आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 21.84 डॉलर प्रति औंसवर कायम आहे. हे वाचा- बिग बींच्या Duplex Flat मध्ये राहणार ‘ही’ अभिनेत्री, देणार इतकं लाख भाडं का वधारला सोन्याचा भाव? एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, आज कॉमेक्सवर स्पॉट गोल्डच्या किमतीत घसरण झाली आहे. याशिवाय सोन्याच्या मागणीवर मजबूत डॉलरचाही परिणाम झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.