मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Nykaa Made History: 'सेल्फ मेड' अब्जाधीश बनणं नव्हतं सोप! Falguni Nayar यांच्याकडून शिका या 4 गोष्टी

Nykaa Made History: 'सेल्फ मेड' अब्जाधीश बनणं नव्हतं सोप! Falguni Nayar यांच्याकडून शिका या 4 गोष्टी

Nykaa CEO Falguni Nayar Joins World's Richest Club: 'वयाच्या 50व्या वर्षी मी कोणताही अनुभव नसताना नायका कंपनीची सुरुवात केली. आज नायका यशस्वी ठरली आहे. नायकाचा हा प्रवास तुमच्यापैकी अनेकांना प्रेरणा देईल,' अशी प्रतिक्रिया फाल्गुनी नायर यांनी व्यक्त केली आहे.

Nykaa CEO Falguni Nayar Joins World's Richest Club: 'वयाच्या 50व्या वर्षी मी कोणताही अनुभव नसताना नायका कंपनीची सुरुवात केली. आज नायका यशस्वी ठरली आहे. नायकाचा हा प्रवास तुमच्यापैकी अनेकांना प्रेरणा देईल,' अशी प्रतिक्रिया फाल्गुनी नायर यांनी व्यक्त केली आहे.

Nykaa CEO Falguni Nayar Joins World's Richest Club: 'वयाच्या 50व्या वर्षी मी कोणताही अनुभव नसताना नायका कंपनीची सुरुवात केली. आज नायका यशस्वी ठरली आहे. नायकाचा हा प्रवास तुमच्यापैकी अनेकांना प्रेरणा देईल,' अशी प्रतिक्रिया फाल्गुनी नायर यांनी व्यक्त केली आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: 'नायका' कंपनीच्या 58 वर्षांच्या सीईओ फाल्गुनी नायर नुकत्याच देशातल्या सर्वांत श्रीमंत सेल्फ मेड (Nykaa CEO Falguni Nayar Joins World's Richest Club) महिला अब्जाधीश बनल्या. देशी-विदेशी ब्रँड्सची सौंदर्यप्रसाधनं (Buy Cosmetics Onlien) ऑनलाइन उपलब्ध करून देणारी नायका (Nykaa Latest News) ही देशातली एक प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी आहे. या कंपनीने 10 नोव्हेंबरला शेअर बाजारात (Nykaa IPO) पदार्पण केलं. कंपनीनं दाखल केलेल्या आयपीओला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 89 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ फाल्गुनी नायर यांची संपत्ती 6.5 बिलियन डॉलर्सवर गेली आहे. त्यामुळे 58 वर्षीय नायर आता भारतातल्या सर्वांत श्रीमंत महिला आहेतच; पण इंडिया ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समधल्या (India Bloomberg Index) जगातल्या सहा महिला अब्जाधीशांमध्ये (World's Billionaire Women) त्यांचा समावेश झाला आहे. नायर यांच्याकडे कंपनीचे जवळपास निम्मे शेअर्स आहेत.

एफएसएन ई-कॉमर्स ही नायकाची पॅरेंट कंपनी शेअर बाजारात दाखल होतानाच युनिकॉर्न कंपनीचा मान मिळवणारी महिलेच्या नेतृत्वाखालची पहिलीच कंपनी आहे. 'वयाच्या 50व्या वर्षी मी कोणताही अनुभव नसताना नायका कंपनीची सुरुवात केली. आज नायका यशस्वी ठरली आहे. नायकाचा हा प्रवास तुमच्यापैकी अनेकांना प्रेरणा देईल,' अशी प्रतिक्रिया फाल्गुनी नायर यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचा-क्रिप्टोकरन्सीमध्ये एका दिवसात डोळे दिपवून टाकणारी वाढ,गुंतवणूकदार झाले कोट्यधीश

कोटक महिंद्रा बँकेत व्यवस्थापकीय संचालक म्हणून यशस्वी कारकीर्द करणाऱ्या फाल्गुनी नायर यांनी आपल्या 50व्या वाढदिवसाच्या काही महिने आधी, 2012 साली नायका कंपनीची पायाभरणी केली. त्यापूर्वी 19 वर्षं त्या कोटक महिंद्रा ग्रुपमध्ये कार्यरत होत्या आणि त्या ग्रुपच्या इन्व्हेटिंग बँकिंग शाखेत उच्च पदावरून त्या निवृत्त झाल्या. अहमदाबादच्या आयआयएम या नामवंत संस्थेतून त्या पदवीधर झालेल्या आहेत. चांगल्या गुंतवणूकदार होण्याच्या त्यांच्या क्षमतेच्या पाठीमागे कदाचित हे कारण असावं. वयाच्या कोणत्या वर्षात आयुष्याची दिशा ठरवावी, याबद्दल काही रूढ समज असतात. ते नायर यांच्या कामगिरीमुळे खोटे ठरले आहेत. फाल्गुनी नायर यांच्या करिअरपासून गुंतवणूकदार कोणते चार धडे घेऊ शकतात, त्याबद्दल पाहू या.

नियोजन आवश्यक (Plan)

कोणत्याही गुंतवणूकदाराला प्रगती करायची असेल, तर नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. फाल्गुनी नायर यांनी स्वतःसाठीच एक डेडलाइन ठरवून घेतली होती, की आपण 50 वर्षांच्या होईपर्यंत स्वतःचं काही तरी सुरू करायचं. 'नायका' हे त्याचं फळ बनलं. संपूर्ण आयुष्यात त्यांनी हिशेबी पद्धतीने निर्णय घेतले, निवड केली. शेअर बाजारात रस असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यानंतर आयआयएममध्ये शिकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 19 वर्षं एका कंपनीत करिअर करून वरच्या पदांवर वाटचाल केली. त्यानंतर अशा क्षेत्राची निवड केली, की जे भारताला तोपर्यंत ज्ञातच नव्हतं. त्यांनी अभ्यासपूर्वक त्या क्षेत्राची निवड केली. गुंतवणूकदारांनी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संशोधन करण्याची गरज आहे, त्याचं हे उदाहरण.

हे वाचा-ATM आणि बँकिंग सेवेत समस्या आल्यास इथे करा तक्रार, त्वरित घेतली जाणार अ‍ॅक्शन

ऐकावे जनाचे, करावे मनाचे

स्टार्टअप (StartUp) लाँच करू इच्छिणाऱ्या सर्वांनाच फाल्गुनी नायर यांनी एका इंटरव्ह्यूत सल्ला दिला आहे. 'मला अशी आशा आहे, की माझ्यासारख्या अनेक महिला त्यांच्या स्वतःसाठी असं स्वप्न पाहण्याचं धाडस करतील,' असं त्या म्हणाल्या. 2012 साली जेव्हा नायका कंपनी स्थापन झाली, तेव्हा सौंदर्यप्रसाधनांची खरेदी स्थानिक दुकानांतूनच केली जायची आणि तिथे उपलब्ध असलेल्या तीन-चार ब्रँड्सची उत्पादनंच खरेदी करण्याला पर्याय नव्हता. त्या वेळी नायर यांनी वेगळा विचार करण्याचं धाडस दाखवलं आणि नायका ही सौंदर्यप्रसाधनांची ई-कॉमर्स वेबसाइट सुरू केली. आता नायका कंपनी 300हून अधिक ब्रँड्सची 30 हजारांहून अधिक सौंदर्यप्रसाधनं आणि अन्य उत्पादनं विकते. तसंच, त्यांची प्रत्यक्ष दुकानंही आहेत.

अधिक (Risk) जोखीम, अधिक नफा? काही वेळा शक्य आहे...

19 वर्षं ज्या कोटक ग्रुपमध्ये वेगवेगळ्या उच्च पदांवर करिअर घडवलं, तिथून बाहेर पडताना त्यांनी विचारपूर्वक जोखीम घ्यायचं ठरवलं. त्यांनी असं स्टार्टअप सुरू करायचा विचार केला, की ज्याचा तोपर्यंत भारतात कधीच विचार केला गेला नव्हता, त्यामुळे साहजिकच त्या क्षेत्रातला रुळलेला रस्ताही नव्हता. 10 वर्षांपूर्वी ऑनलाइन ब्युटी प्लॅटफॉर्म ही कल्पना भारतीयांना तितकीच नवी होती, जितकी क्रिप्टोकरन्सी ही संकल्पना सध्या भारतीयांना नवी आहे. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक सध्या धोकादायक वाटत असेल, पण आगामी काळात त्यात अब्जाधीश बनवण्याची क्षमता आहे. फाल्गुनी नायर यांनी अशीच जोखीम त्या वेळी उचलली, म्हणून आज त्या जगप्रसिद्ध बनल्या आहेत.

हे वाचा-या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला 140 टक्क्यांचा रिटर्न!

विकास आणि प्रॉफिटॅबिलिटी - दोन्हींची निवड करा

मनीकंट्रोलला काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत फाल्गुनी नायर म्हणाल्या होत्या, 'ब्युटी आणि फॅशन कॉमर्ससारखी आमची उद्योगक्षेत्रं अद्याप विकासाच्या प्राथमिक टप्प्यांवर आहेत. यात विकासाला बराच वाव आहे. गुंतवणूकदार असा विचार करतात, की विक्री वाढल्यावर प्रॉफिटॅबिलिटी अनेक पटींनी वाढत जाते. त्यांनी असा विचार करावा, की आत्ता कमी असलेली प्रॉफिटॅबिलिटी (Profitability) एकदा प्रगती झाल्यावर नाट्यमयरीत्या बदलू शकते.'

थोडक्यात, त्यांच्या शब्दांत सांगायचं झालं, तर गुंतवणुकीच्या बाबतीत विकास आणि प्रॉफिटॅबिलिटी या दोन्हींची निवड करावी आणि त्याबद्दल जागरूक राहावं.

First published:

Tags: Money