नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel price) दरात भरमसाठ वाढ झाली आहे. यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडलं आहे, कारण पेट्रोल-डिझेलच्या दरावर जीवनावश्यक इतर वस्तूंचीही किंमत निर्धारित असते. पण आता ऐन दिवाळीच्या (diwali 2021 petrol Price) मुहुर्तावर अखेर मोदी सरकारने (modi government decision on petrol diesel excise duty) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर (Petrol-Diesel Excise Duty Cut) कमी केला आहे.
यामुळे आज दिवाळीच्या दिवशी इंधनाचे दर कमी झाले आहेत. या कपातीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 109.98 रुपये आणि डिझेलचे दर 94.14 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. मुंबईत मंगळवारी पेट्रोलचे दर 115.85 रुपये प्रति लीटर होते, अर्थात पेट्रोलचे दर 5.87 रुपयांनी कमी झाले आहेत. दरम्यान डिझेलचे दर मंगळवारी 106.62 रुपये प्रति लीटर होते, अर्थात आज मुंबईत डिझेल 12.48 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
ऑक्टोबर महिन्यात 7.45 रुपयांनी महागलं पेट्रोल
ऑक्टोबर महिन्यात 25 हून अधिक वेळा पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. दररोज 30 आणि 35 पैसे दराने वाढ होऊन ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 7.45 रुपये महागलं आहे. तर डिझेल 7.90 रुपयांनी वाढलं आहे. 01 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 101.89 रुपये प्रति लीटर होते, तर डिझेल 90.17 रुपये प्रति लीटर होते.
हे वाचा-Petrol-Diesel वरील उत्पादन शुल्क कमी, केंद्राचं होणार 1 लाख कोटींचे नुकसान
चार महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price on 4 November 2021)
>> दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर
>> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर
>> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर
>> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर
दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
हे वाचा-केंद्रानंतर काही राज्यांकडून व्हॅटमध्ये कपात, ठाकरे सरकार देणार Diwali Gift?
कसे तपासाल पेट्रोल-डिझेलचे नवे दर
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike