मुंबई, 4 नोव्हेंबर : मोदी सरकारने दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर इंधनावरील करात कपात करुन नागरिकांना दिवाळीचं एक गिफ्टच दिलं आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये पाच रुपयांची तर डिझेलवरील व्हॅटमध्ये 10 रुपयांची कपात केल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त (Petrol - Diesel price reduce) झाले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशातील अनेक राज्यांनी सुद्धा करात कपात करुन नागरिकांना दिलासा दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील ठाकरे सरकार (Thackeray Government) इंधनावरील व्हॅट कपात करुन महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीचं गिफ्ट देणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट अर्थात मूल्यवर्धित कर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे महागाईने होरपळलेल्या जनतेला एक मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच केंद्र सरकारने सर्व राज्यांना आपणही करात कपात करावी असे आवाहन केले आहे.
अनेक राज्यांनी घेतला करात कपात करण्याचा निर्णय
केंद्र सरकारने इंधनावरील व्हॅट कपात केल्यावर इतरही राज्यांनी करात कपात करण्याचा निर्णय घेत नागरिकांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. यामध्ये गुजरात, उत्तरप्रदेश, मणिपूर, कर्नाटक, गोवा, उत्तराखंड, त्रिपूरा, आसाम या राज्यांचा समावेश आहे. तर हिमाचल प्रदेश सरकारने व्हॅट कपात करण्याच्या संदर्भात लवकरच नोटिफिकेशन काढणार असल्याचं म्हटलं आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये सात रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आसाममध्ये पेट्रोल-डिझेल सात रुपयांनी स्वस्त झालं आहे.
Assam CM Himanta Biswa Sarma announces reduction in VAT on petrol & diesel by Rs 7 with immediate effect pic.twitter.com/yx5qeTPGup
— ANI (@ANI) November 3, 2021
आसाम नंतर त्रिपूरा सरकारनेही इंधनावरील कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता त्रिपूरामध्ये सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे दर सात रुपये प्रति लिटरने कमी झाले आहेत.
After Assam, Tripura CM Biplab Kumar Deb also announces to reduce prices of petrol & diesel by Rs 7 effective from tomorrow pic.twitter.com/MSO1lNKDiy
— ANI (@ANI) November 3, 2021
Uttarakhand CM Pushkar Singh Dhami announces to reduce VAT on petrol by Rs 2 per litre in the state pic.twitter.com/44Lo2XPLG2
— ANI (@ANI) November 3, 2021
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी सुद्धा पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासोबतच कर्नाटक आणि गोवा सरकारने सुद्धा इंधानावरील कदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्नाटकात आणि गोव्यात पेट्रोल-डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे.
पेट्रोल पंपचालक बंद पुकारण्याची शक्यता
पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला कात्री बसली आहे. अखेर जनतेच्या रोषापुढे मोदी सरकारला नरमाईची भूमिका घ्यावा लागली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. पण, आता पेट्रोल पंपचालकांची डोकेदुखी वाढली आहे. अचानक झालेल्या कपातीमुळे पेट्रोलपंपचालकांचे मोठे नुकसान होणार आहे. . त्यामुळे पंपचालक बंद पुकारण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे.पेट्रोल आण डिझेलचे दर अचानक कमी केल्याने पेट्रोल पंप चालक अडचणीत आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Petrol and diesel, Petrol price, महाराष्ट्र