मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price Today: सोन्यामध्ये घसरण सुरूच, चांदी देखील 515 रुपयांनी झाली स्वस्त

Gold Price Today: सोन्यामध्ये घसरण सुरूच, चांदी देखील 515 रुपयांनी झाली स्वस्त

Gold Silver Price, 1 September 2021: सोन्याचांदीच्या किंमतीत बुधवारी घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीचे दरही कमी झाले आहेत.

Gold Silver Price, 1 September 2021: सोन्याचांदीच्या किंमतीत बुधवारी घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीचे दरही कमी झाले आहेत.

Gold Silver Price, 1 September 2021: सोन्याचांदीच्या किंमतीत बुधवारी घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीचे दरही कमी झाले आहेत.

नवी दिल्ली, 01 सप्टेंबर: भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) कमी होत आहेत. आज 1 सप्टेंबर रोजी देखील सोन्याचे दर (Gold Rates) किरकोळ कमी झाले आहेत. तर चांदीच्या किंमतीत देखील (Silver Price Today) आज घसरण पाहायला मिळाली आहे. आधीच्या व्यवहाराच्या सत्रात सोन्याचे दर  46,129 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर 62,336 रुपये प्रति किलोग्रॅमवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आज कमी झाले आहेत. तर चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही.

सोन्याचे नवे दर (Gold Price today on 1st Sept 2021)

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर बुधवारी किरकोळ 6 रुपयांनी कमी झाले आहेत. दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,123 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1,811 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.

हे वाचा-अर्थव्यवस्थेबाबत सुधारणेचे संकेत, ऑगस्टमध्ये GST Collection 1 लाख कोटींपार

चांदीचे नवे दर (Silver Price today on 1st Sept 2021)

सोन्यापाठोपाठ चांदीच्या किंमतीतही आज घसरण पाहायला मिळाली आहे. चांदी 515 रुपये प्रति किलोने कमी झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचे दर 61,821 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. याठिकाणी चांदीचे दर 23.82 डॉलर प्रति औंस आहेत.

हे वाचा-Jan Dhan खातेधारकांसाठी खूशखबर! मोदी सरकार लवकरच मोठी घोषणा करण्याच्या विचारात

सोन्याचे दर का उतरले?

एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर सातत्याने कमी-जास्त होत आहेत. आज कॉमेक्सवर देखील स्पॉट गोल्डची किंमत कमी झाली आहे. भारतीय शेअर बाजारात देखील तेजी पाहायला मिळते आहे. यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव पाहायला मिळतो आहे.

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price