नवी दिल्ली, 01 सप्टेंबर: कोरोना काळात अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये जीएसटी कलेक्शन (GST Collection) एक लाख कोटींपेक्षा जास्त आहे. ऑगस्ट मध्ये सरकारचे जीएसटी कलेक्शन 1.12 लाख कोटी रुपये आहे. सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटी कलेक्शन एक लाख कोटींपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमधील जीएसटी कलेक्शनच्या तुलनेत यावर्षी जीएसटी कलेक्शन 30 टक्के जास्त आहे.
याआधी जुलै महिन्यात जीएसटी कलेक्शन 1.16 लाख कोटी रुपये होते तर जून महिन्यात GST Collection 92,849 कोटी होते. अर्थ मंत्रालयाने असं म्हटलं आहे की येणाऱ्या महिन्यात जीएसटीमधून मिळणारे उत्पन्न अधिक असेल.
हे वाचा-Sovereign Gold मध्ये स्वस्त सोन्यासह मिळतील हे 6 फायदे, आहे 2 दिवसांची संधी
✅₹ 1,12,020 crore of gross GST revenue collected in August ✅The revenues for the month of August 2021 are 30% higher than the GST revenues in the same month last year Read more 👉 https://t.co/0mW2gDBBWG pic.twitter.com/YA94cQ200J
— CBIC (@cbic_india) September 1, 2021
जीएसटी कलेक्शनवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम पाहायला मिळाला. जूनमध्ये जीएसटीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न 1 लाख कोटींपेक्षा कमी होती. याआधी सातत्याने 9 महिने जीएसटी कलेक्शन 1 लाखांपेक्षा जास्त होतं. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये जीएसटी कलेक्शन 1,16,293 कोटी होतं. तर या महिन्यात कलेक्शन 1.12 लाख कोटी आहे. हे या गोष्टीचे संकेत आहेत की अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. अर्थव्यवस्थेतील सुधारणेह बनावट जीएसटी बिल आकारणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.