लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर हे परिणाम, जाणून घ्या काय आहेत आजचे दर

लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर हे परिणाम, जाणून घ्या काय आहेत आजचे दर

लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलची विक्री मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 26 मार्च : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगभरात आणीबाणीसारखा प्रसंग निर्माण झाला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस म्हणजेच 3 आठवड्यांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. हा 3 आठवड्यांचा लॉकडाऊन जनता कर्फ्यूपेक्षा कठोर असेल असं देखील पंतप्रधान म्हणाले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची विक्री कमी झाली आहे. काही शहरांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना पेट्रोल-डिझेलची विक्री केली जात आहे. दरम्यान गेल्या दहा दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थीर आहेत. जे भाव 16 मार्चला होते, तेच भाव आजही आहेत.

महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे भाव

मुंबई : पेट्रोल- 75.30 रु. प्रति लीटर, डिझेल 65.21 रु. प्रति लीटर

दिल्ली : पेट्रोल- 69.59 रु. प्रति लीटर, डिझेल 62.29 रु. प्रति लीटर

(हे वाचा-8 कोटी महिलांना 3 महिन्यासाठी मिळणार मोफत सिलेंडर, केंद्र सरकारची मोठी घोषणा)

कोलकाता : पेट्रोल- 72.29 रु. प्रति लीटर, डिझेल 64.62 रु. प्रति लीटर

चेन्नई : पेट्रोल- 72.28 रु. प्रति लीटर, डिझेल 65.71 रु. प्रति लीटर

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये बँकाची काम सुरूच,महत्त्वाचं काम असेल तर जाणून घ्या बदललेल्या वेळा)

पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये दररोज काहीसा बदल होत आणि दररोज त्याची समीक्षा केली जाते. सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जारी करण्यात येतात. तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घेऊ शकता.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये SBI चे 90 टक्के एटीएम सुरू, वाचा पैसे काढताना कोणती खबरदारी घ्याल)

IOC चे ग्राहक 9224992249 वर RSP असा, BPCL चे ग्राहक 9223112222 वर RSP आणि HPCL चे ग्राहक 9222201122 वर HPPRICE असा मेसेज करून ही माहिती मिळवू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2020 06:28 PM IST

ताज्या बातम्या