Home /News /money /

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, काय आहे आजचा एक लीटरचा भाव

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, काय आहे आजचा एक लीटरचा भाव

Petrol-Diesel Price Today

Petrol-Diesel Price Today

पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel price today) बुधवारी स्थिर आहेत. मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करत सामान्यांना काहीसा दिलासा दिला होता.

    नवी दिल्ली, 25 ऑगस्ट: पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel price today) बुधवारी स्थिर आहेत. मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करत सामान्यांना काहीसा दिलासा दिला होता. मंगळवारी पेट्रोलचे दर 15 पैशांनी तर डिझेलही 15 पैशांनी स्वस्त झालं होतं. त्याआधी रविवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या होत्या, मात्र सोमवारी दरात कोणताही बदल झाला नव्हता. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होऊन देखील आज इंधनाचे भाव स्थिर आहेत. गेल्या काही दिवसात देखील क्रूड ऑइलचे दर घटूनही पेट्रोल-डिझेलचे दर विशेष कमी झालेले नाहीत. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Price in Mumbai) 107.52 रुपये आणि डिझेलचे दर (Diesel Price in Mumbai) 96.48 रुपये प्रति लीटर आहेत. महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल-डिझलचे भाव >> दिल्ली पेट्रोल 101.49 रुपये आणि डिझेल 88.92 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 107.52 रुपये आणि डिझेल 96.48 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 99.20 रुपये आणि डिझेल 93.52 रुपये प्रति लीटर हे वाचा-सॅलरी स्लिपकडे कधीही करू नका दुर्लक्ष; या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल मिळते माहिती >> कोलकाता पेट्रोल 101.82 रुपये आणि डिझेल 91.98 रुपये प्रति लीटर >> नोएडा पेट्रोल 98.79 रुपये आणि डिझेल 89.49 रुपये प्रति लीटर >> जयपूर पेट्रोल 108.42 रुपये आणि डिझेल 98.06 रुपये प्रति लीटर >> भोपाळ पेट्रोल 109.91 रुपये आणि डिझेल 97.72 रुपये प्रति लीटर SMS करुन जाणून घ्या इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. हे वाचा-लवकरच या 6 खासगी कंपन्या देखील करणार पेट्रोलची विक्री, ग्रामीण भागात होणार फायदा तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या