• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol Price Today: 18व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, मुंबई-पुण्यात पेट्रोल अजूनही शंभरीपार

Petrol Price Today: 18व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, मुंबई-पुण्यात पेट्रोल अजूनही शंभरीपार

Petrol-Diesel Price Today

Petrol-Diesel Price Today

सरकारी तेल कंपन्यांनी आज गुरुवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-diesel price today) आज कोणताही बदल झालेला नाही.

  • Share this:
    मुंबई, 23 सप्टेंबर: सरकारी तेल कंपन्यांनी आज गुरुवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत  (Petrol-diesel price today) आज कोणताही बदल झालेला नाही. आज सलग 18व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol diesel price) स्थिर आहेत. गेल्या 5 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी इंधन दरात 15 पैशांची सवलत दिली होती. यानंतर सलग दर स्थिर आहेत. आज मुंबईत पेट्रोल (Petrol Price in Mumbai) 107.26 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल (Diesel Price in Mumbai) 96.19 रुपये प्रति लीटर आहे. दरम्यान गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते आज पुण्यात पेट्रोलचे (Petrol Price in Pune) दर ₹ 0.06 ने कमी झाले आहेत. अर्थात पुण्यातही पेट्रोलच्या दरात विशेष बदल झालेला नाही. या किरकोळ बदलानंतर पुण्यात दर  106.76 रुपये प्रति लीटर आहेत. तर पुण्यात डिझेलही (Diesel Price in Pune) ₹0.06 ने कमी होऊन 94.24 रुपये प्रति लीटरवर आहे. हे वाचा-VIDEO: 'Amazonने दिली 8,546 कोटी रुपयांची लाच', काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाही पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत (Petrol and diesel are not covered by GST) येणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 45 व्या GST काउन्सिल बैठकीनंतर वित्त मंत्री निर्मला सीमारामन यांनी यामध्ये घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. (Nirmala Sitharaman 45th GST Council meeting in Lucknow). वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी काउन्सिलच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं की, जीएसटी काउन्सिलने सांगितलं की, पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची ही योग्य वेळ नाही. काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर? (Petrol-Diesel Price on 22nd Sept 2021) >> मुंबई पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर >> पुणे पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर >> दिल्ली पेट्रोल  101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर हे वाचा-1 ऑक्टोबरपासून डिजिटल पेमेंट पद्धतीत मोठे बदल; RBI हे नवे नियम लागू करणार >> नोएडा पेट्रोल 98.52 रुपये आणि डिझेल 89.21 रुपये प्रति लीटर >> जयपूर पेट्रोल 108.17 रुपये आणि डिझेल 97.76 रुपये प्रति लीटर >> भोपाळ पेट्रोल 109.63 रुपये आणि डिझेल 97.43 रुपये प्रति लीटर SMS च्या माध्यमातून तपासा इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता.  तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: