मराठी बातम्या /बातम्या /मनी /Petrol Diesel Price Today: इंडियन ऑइलकडून इंधर दर जारी, तपासा मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Petrol Diesel Price Today: इंडियन ऑइलकडून इंधर दर जारी, तपासा मुंबई-पुण्यातील आजचा भाव

petrol price today

petrol price today

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel Price Today) गेल्या अनेक दिवसांपासून बदल झालेला नाही. आज पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price on 19 January 2022) स्थिर आहेत.

नवी दिल्ली, 19 जानेवारी : आयओसीएलने (IOCL) आज बुधवारी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today 19 January 2022) जारी केले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel Price Today) गेल्या अनेक दिवसांपासून बदल झालेला नाही. आज पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price on 19 January 2022) स्थिर आहेत. मात्र जरी इंधनाचे दर वाढत नसले तरी ते कमी देखील होत नाही आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला पेट्रोल-डिझेल खरेदी करताना चाप बसतोच आहे. मुंबईत आज पेट्रोल दर 109.98 रुपये आहे. तर डिझेल दर 94.14 रुपये प्रति लीटर आहे.

इंधन दरात 4 नोव्हेंबर 2021 नंतर कोणतेही बदल झालेले नाहीत. त्यावेळी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये प्रति लीटरने कपात केली होती.

हे वाचा - छोटे व्यापारी आणि दुकानदारांना सहज उपलब्ध होणार 10 लाखांपर्यंत लोन

दिल्लीत आज (Petrol Diesel Price Today 19 January 2022) पेट्रोल 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत चढ-उतारादरम्यान देशात इंधन दर अद्याप स्थिर आहे.

शहरपेट्रोलचा भाव (प्रति लीटर)डिझेलचा भाव (प्रति लीटर)
पुणे109.45 रुपये92.25 रुपये
मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
नाशिक109.49 रुपये92.29 रुपये
नागपूर109.71 रुपये92.53 रुपये
अहमदनगर110.15 रुपये92.92 रुपये
औरंगाबाद110.38 रुपये93.14 रुपये
रत्नागिरी110.97 रुपये93.68 रुपये
रायगड109.48 रुपये92.25 रुपये
परभणी112.49 रुपये95.17 रुपये
पालघर109.75 रुपये92.51 रुपये
सांगली110.03 रुपये92.83 रुपये
कोल्हापूर110.09 रुपये92.89 रुपये

देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

हे वाचा - Crude Oil Price 7 वर्षांच्या सर्वोच्च स्तरावर, पेट्रोल-डिझेल किंमती आणखी वाढणार?

असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर -

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

First published:

Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price