Home /News /money /

छोटे व्यापारी आणि दुकानदारांना सहज उपलब्ध होणार 10 लाखांपर्यंत लोन, Canera Bank आणि Lendingkart चा करार

छोटे व्यापारी आणि दुकानदारांना सहज उपलब्ध होणार 10 लाखांपर्यंत लोन, Canera Bank आणि Lendingkart चा करार

लेंडिंगकार्ट आणि कॅनरा बँक यांच्यात मंगळवारी हा करार झाला आहे. लेंडिंगकार्टचे म्हणणे आहे की कॅनरा बँक आता एमएसएमईंना कर्ज देण्यासाठी “Lendingkart 2gthr” प्लॅटफॉर्म वापरेल. यासह कर्ज देण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 18 जानेवारी : लहान व्यावसायिक आणि दुकानदारांना आता घरबसल्या 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळणार आहे. कॅनरा बँकेने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) सुलभ कर्ज देण्यासाठी फिनटेक कंपनी लेंडिंगकार्टशी (Lendingkart) हातमिळवणी केली आहे. या करारामुळे कॅनरा बँकेला (Canera Bank) कर्ज देण्यासाठी कमी वेळ लागणार आहे, कारण कर्जासंबंधीची सर्व कामे ऑनलाइन होणार आहेत. लेंडिंगकार्ट आणि कॅनरा बँक यांच्यात मंगळवारी हा करार झाला आहे. लेंडिंगकार्टचे म्हणणे आहे की कॅनरा बँक आता एमएसएमईंना कर्ज देण्यासाठी “Lendingkart 2gthr” प्लॅटफॉर्म वापरेल. यासह कर्ज देण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे. कोणताही छोटा व्यवसायित कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने ऑनलाइन कर्ज प्रक्रियेमुळे अर्जदाराला लवकरच कर्ज मिळेल. Jio, Vi, Airtel चे 'हे' प्रीपेड प्लॅनमध्ये मिळतायेत Data आणि Calling सोबत अनेक बेनिफिट्स सुलभ व्याजदरावर कर्ज कॅनरा बँकेचे कार्यकारी संचालक ए. मनीमेखालई यांनी सांगितलं की, अजूनही कर्जापासून वंचित राहिलेल्या अशा लोकांना सुलभ व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे हा बँकेचा उद्देश आहे. म्हणूनच आम्ही लेंडिंगकार्ट फायनान्स लिमिटेडशी करार केला आहे. याद्वारे आम्ही आता मुद्रा वर्गवारीत येणाऱ्या एमएसएमईंना कर्जाची सुविधा देऊ. छोटे दुकानदार आणि व्यावसायिकांना कर्ज घेण्यासाठी बँकेत यावे लागणार नाही. सर्व काम फक्त ऑनलाइन केले जाईल. यामध्ये कर्ज अर्जापासून ते कर्ज मंजूरी (Online Loan Approval) पर्यंत बराच वेळ वाचेल आणि कर्ज लवकर मंजूर होईल. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची ग्राहकसंख्या पाच कोटींच्या पार; देशातील वेगाने विस्तारणाऱ्या डिजिटल पेमेंट बँकेपैकी एक बँक ठरली लवकरच कर्ज मिळेल लेंडिंगकार्टचे सह-संस्थापक आणि सीईओ हर्षवर्धन लुनिया म्हणाले की, या प्लॅटफॉर्मचा एमएसएमईंना खूप फायदा होईल. याद्वारे ते कर्ज घेऊ शकतील आणि देशातील मोठ्या बँकेशी जोडण्याची संधी मिळवू शकतील. या प्लॅटफॉर्मवर वेगाने कर्ज दिले जाईल. कॅनरा बँक लेंडिंगकार्ट प्लॅटफॉर्म 'xlr8' चा वापर जलद कर्ज निर्माण आणि वितरण करण्यासाठी करेल. लुनिया म्हणाले की, लेंडिंगकार्ट देशभरातील छोटे दुकानदार आणि व्यायसायिकांना कर्ज देण्यास मदत करेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank, Loan, Money

    पुढील बातम्या