जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Crude Oil Price 7 वर्षांच्या सर्वोच्च स्तरावर, पेट्रोल-डिझेल किंमती आणखी वाढणार? ग्राहकांना बसणार मोठा झटका

Crude Oil Price 7 वर्षांच्या सर्वोच्च स्तरावर, पेट्रोल-डिझेल किंमती आणखी वाढणार? ग्राहकांना बसणार मोठा झटका

Crude Oil Price 7 वर्षांच्या सर्वोच्च स्तरावर, पेट्रोल-डिझेल किंमती आणखी वाढणार? ग्राहकांना बसणार मोठा झटका

जगभरातल्या राजकीय घडामोडी आणि ओमायक्रॉनची (Omicron Latest Updates) चिंता काहीशी कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil price) सातत्याने वाढत असल्याचं चित्र आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 18 जानेवारी: जगभरातल्या राजकीय घडामोडी आणि ओमायक्रॉनची (Omicron Latest Updates) चिंता काहीशी कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil price) सातत्याने वाढत असल्याचं चित्र आहे. सध्या कच्च्या तेलाचे भाव वाढून 87 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या सात वर्षांतले हे सर्वांत जास्त दर आहेत. कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असल्याचा हा सलग पाचवा आठवडा आहे. ऑक्टोबर 2014 पासून कच्च्या तेलात झालेली ही विक्रमी वाढ असल्याचं म्हटलं जात आहे. या वेळी कच्च्या तेलाची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यासह जगभरातल्या व्यापारी घडामोडींमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे भारत सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर नियंत्रण ठेवणं कठीण होणार आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसू शकते. कारण कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल, डिझेलचे दर अवलंबून असतात. कच्च्या तेलाचे दर वाढले की पेट्रोल-डिझेलचे दर देखील वाढतात आणि दर कमी झाले तर इंधनाचे दर देखील कमी होतात. हे वाचा- Network18 ची रेकॉर्डब्रेक कामगिरी, गेल्या तिमाहीत मोडले कमाईचे सर्व विक्रम येमेनमधल्या हुती बंडखोरांनी 17 जानेवारी 2022 रोजी अबू धाबीमध्ये तेलाच्या टाकीचा स्फोट केला होता. यामध्ये 3 नागरिकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला ड्रोनच्या मदतीने करण्यात आल्याची माहिती आहे. या महिन्यात हूती बंडखोरांनी केलेला हा दुसरा हल्ला होता. तेल उत्पादन रोखण्यासाठी हूती बंडखोर असे प्रकार करत आहेत. या घटनेनंतरच कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. कच्च्या तेलाचे भाव 1 डिसेंबर 2021 रोजी 69 डॉलर्स प्रति बॅरल होते. अवघ्या सहा आठवड्यांत त्यात जवळपास 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, तेल उत्पादन क्षमतेत वाढ होण्याची शक्यता असल्याचं वाटत नाही. उत्पादन वाढवण्यासाठी नवीन गुंतवणूकही नाही. ओमायक्रॉनचं संकट आता कुठे कमी होतंय. त्यानंतर आता मागणी वाढल्यामुळे तेलाच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत. हे वाचा- शेअर बाजारात नव्या वर्षातील मोठी घसरण, Sensex 554 तर Nifty 195 अंकांनी खाली या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 90 डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा अंदाज मॉर्गन स्टॅन्लेने (Morgan Stanley) वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांत एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (EIA) आणि ब्लूमबर्ग यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, 2022 सालासाठी OPEC देशांची तेल उत्पादन क्षमता घटून अनुक्रमे प्रति दिन 8 लाख आणि 12 लाख बॅरल प्रतिदिन होईल, असं म्हटलं होतं. या अहवालानंतर जेपी मॉर्गनने येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 30 डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या मते, कच्च्या तेलाची किंमत या वर्षी 125 डॉलर्स आणि 2023 पर्यंत 150 डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. हे वाचा- कोरोना संकटात Umang App वरुन काढा पैसे; PF Advance चा फायदा घेण्यासाठी काय कराल? कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 10 डॉलर्सने वाढली, तर यामुळे राजकोषीय तूट 10 आधार अंकांनी वाढते. तसंच भारतात मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात केली जाते. तेल आयात खर्चात वाढ झाल्यामुळे चालू खात्यातली तूटदेखील (CAD) वाढते. याबरोबरच महागाईदेखील वाढते. त्यामुळे आरबीआयला (RBI) धोरणात्मक व्याजदर उदार ठेवणं कठीण होते. आयात खर्च वाढल्यामुळे डॉलरचा साठा कमी होतो आणि त्यामुळे रुपया कमजोर पडतो. अशा प्रकारे कच्च्या तेलाच्या उसळीमुळे सरकारचा खर्चाचा ताळेबंद पूर्णपणे बिघडतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: petrol
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात