Home /News /money /

Petrol Diesel Price Today: आज या दराने खरेदी करावं लागणार इंधन, मुंबईत अजूनही पेट्रोल 110 रुपयांवर

Petrol Diesel Price Today: आज या दराने खरेदी करावं लागणार इंधन, मुंबईत अजूनही पेट्रोल 110 रुपयांवर

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात इंधनाच्या दरांमध्ये (Fuel Price on 08th December) मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price Today) स्थिर आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 08 डिसेंबर: सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात इंधनाच्या दरांमध्ये (Fuel Price on 08th December) मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price Today) स्थिर आहेत. दरम्यान आज 07 डिसेंबर रोजी देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. अर्थात जरी पेट्रोल-डिझेलचे दर बदलले नसले तरीही आजचे दर सामान्यांच्या खिशाला चाप बसवणारेच आहेत. मुंबईच्या तुलनेत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी आहेत. याठिकाणी केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील वॅटमध्ये कपात (Kejriwal Government slashes vat on petrol) करण्यााच निर्णय घेतला होता. परिणामी दिल्लीत पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त झालं आहे. दिल्लीमध्ये आज 1 लीटर पेट्रोलचा भाव 103.93 रुपयांवरून कमी होऊन 95.41 रुपये प्रति लीटर झाला आहे. हे वाचा-Zoom कॉलवरून 900 कर्मचाऱ्यांना बेरोजगार करणारे विशाल गर्ग कोण आहेत? आजचे इंधनाचे दर
    शहर पेट्रोलचा भाव (प्रति लीटर) डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    दिल्ली 95.41 रुपये 86.67 रुपये
    मुंबई 109.98 रुपये 94.14 रुपये
    चेन्नई 101.40 रुपये 91.43 रुपये
    कोलकाता 104.67 रुपये 89.79 रुपये
    श्रीगंगानगर 114.01 रुपये 98.39 रुपये
    लखनऊ 95.28 रुपये 86.80 रुपये
    पोर्ट ब्लेअर 82.96 रुपये 89.33 रुपये
    गांधीनगर 95.35 रुपये 89.33 रुपये
    दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते हे वाचा-Reliance चा ऐतिहसिक करार, TA’ZIZ सोबत करणार रसायनांची निर्मिती अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel prices continued to rise

    पुढील बातम्या