मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Zoom कॉलवरून 900 कर्मचाऱ्यांना बेरोजगार करणारे विशाल गर्ग कोण आहेत?

Zoom कॉलवरून 900 कर्मचाऱ्यांना बेरोजगार करणारे विशाल गर्ग कोण आहेत?

विशाल गर्ग हे Better.Com चे संस्थापक आणि सध्याचे CEO आहेत. ही एक डिजिटल-फर्स्ट होमओनरशिप कंपनी आहे. गर्ग यांनी एका कॉलमध्ये जवळपास 900 कर्मचाऱ्यांना त्यांनी नोकरीवरुन काढून टाकलं आहे.

विशाल गर्ग हे Better.Com चे संस्थापक आणि सध्याचे CEO आहेत. ही एक डिजिटल-फर्स्ट होमओनरशिप कंपनी आहे. गर्ग यांनी एका कॉलमध्ये जवळपास 900 कर्मचाऱ्यांना त्यांनी नोकरीवरुन काढून टाकलं आहे.

विशाल गर्ग हे Better.Com चे संस्थापक आणि सध्याचे CEO आहेत. ही एक डिजिटल-फर्स्ट होमओनरशिप कंपनी आहे. गर्ग यांनी एका कॉलमध्ये जवळपास 900 कर्मचाऱ्यांना त्यांनी नोकरीवरुन काढून टाकलं आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 7 डिसेंबर : बेटर डॉट कॉमचे (Better.Com) CEO विशाल गर्ग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या चर्चेचं कारण ठरलंय त्यांची त्यांचा एक Zoom कॉल. या एका कॉलमध्ये जवळपास 900 कर्मचाऱ्यांना त्यांनी नोकरीवरुन काढून टाकलं आहे. एका कर्मचाऱ्याने रेकॉर्ड केलेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विशाल गर्ग सांगताना दिसत आहेत की, कंपनी त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी (10,000) 9 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारत आणि अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना बसणार आहे.

व्हिडीओमध्ये गर्ग असं सांगताना दिसत आहेत की, 'जर तुम्ही या कॉलवर असाल तर तुम्ही त्या दुर्दैवी ग्रुपचा भाग आहात जो बंद केला जात आहे. तुमची येथील नोकरी तत्काळ प्रभावाने समाप्त केली जात आहे. जेव्हापासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे, तेव्हापासून गुगल सर्चमध्ये विशाल गर्ग आणि त्याची ऑनलाइन मोर्टाज कंपनीबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत आणि हे प्रश्नही सातत्याने वाढत आहेत.

कोण आहे विशाल गर्ग?

विशाल गर्ग हे Better.Com चे संस्थापक आणि सध्याचे CEO आहेत. ही एक डिजिटल-फर्स्ट होमओनरशिप कंपनी आहे. त्यांच्या लिंक्डइन (LinkedIn) बायोनुसार, गर्ग हे वन झिरो कॅपिटल या गुंतवणूक होल्डिंग कंपनीचे संस्थापक भागीदार देखील आहेत.

Golden Chance! उमेदवारांनो, घरबसल्या करा 'नीती आयोगात' Internship; अर्जासाठी फक्त 3 दिवस शिल्लक

द इंडिपेंडंटच्या म्हणण्यानुसार, त्यांनी वित्त आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्क विद्यापीठात प्रवेश घेतला आणि 2000 मध्ये, त्यांचा हायस्कूल मित्र आणि भागीदार रझा खान यांच्यासोबत MyRichUncle नावाची प्रायव्हेट स्टुडंट लोन कंपनी सुरू केली.

गर्ग यांची MyRichUncle कंपनी Merrill Lycnh आणि नंतर Bank oF America ने विकत घेतली. मात्र, दोन वर्षांनंतर ही कंपनी दिवाळखोरीत निघाली.

गर्ग आणि खान यांना दुसरी कंपनी सापडली, मात्र तेव्हा त्यांच्यात गोष्टी बिघडल्या, ज्यामुळे खान यांच्या वतीने गर्ग यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आणि गर्ग यांनी खान यांच्यावर चोरीचा गंभीर आरोप केला. खान यांच्या खटल्याच्या एका वर्षानंतर गर्ग यांनी Better.Com कंपनी सुरू केली.

Government Jobs: 'या' सरकारी Jobs साठी आज सुरु करा तयारी; लाखो रुपये मिळेल पगार

विशाल गर्ग ट्रेंडिंगमध्ये का आहेत?

Zoom कॉलवर आपल्या 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर गर्ग इंटरनेटवर ट्रेंड करत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ते म्हणत आहे की, 'मी तुमच्यासाठी कोणतीही चांगली बातमी आणलेली नाही. मार्केट बदललं आहे, तुम्हाला माहित आहे आणि टिकून राहण्यासाठी आम्हाला त्यासोबत जावे लागेल. त्यामुळे आशा आहे की आम्ही आमचे मिशन पुढे चालू ठेवू शकू. ही बातमी तुम्हाला ऐकायला आवडेल अशी नाही, पण शेवटी हा माझा निर्णय होता आणि तुम्ही माझे ऐकावे अशी माझी इच्छा होती. हा खरोखरच आव्हानात्मक निर्णय होता.

गर्ग पुढे म्हणाले की, माझ्या कारकिर्दीत ही दुसरी वेळ आहे की मी हे करत आहे आणि मला ते करायचे नाही. शेवटच्या वेळी मी हे केले तेव्हा मी रडलो होती. यावेळी, मला अधिक मजबूत होण्याची आशा आहे. मार्केट, परफॉर्मन्स आणि प्रोडक्टिव्हिटी यासारख्या विविध कारणांमुळे आम्ही सुमारे 15 टक्के कंपनी कपात करत आहोत.

First published:

Tags: Job