मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Reliance चा अबुधाबीच्या कंपनीसोबत ऐतिहसिक करार, 200 कोटी डॉलरच्या प्रकल्पातून रसायनांची निर्मिती

Reliance चा अबुधाबीच्या कंपनीसोबत ऐतिहसिक करार, 200 कोटी डॉलरच्या प्रकल्पातून रसायनांची निर्मिती

भारत आणि जगभरातील रसायनांची मागणी लक्षात घेता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने अबुधाबीतील कंपनीसोबत ऐतिहासिक करार केला आहे.

भारत आणि जगभरातील रसायनांची मागणी लक्षात घेता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने अबुधाबीतील कंपनीसोबत ऐतिहासिक करार केला आहे.

भारत आणि जगभरातील रसायनांची मागणी लक्षात घेता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने अबुधाबीतील कंपनीसोबत ऐतिहासिक करार केला आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 7 डिसेंबर: रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड या कंपनीनं (Reliance Industries Ltd) अबु धाबीची (Abu Dhabi) कंपनी ‘अबु धाबी केमिकल्स डेरिव्हेटिव्ह कंपनी लिमिटेडसोबत (Abu Dhabi Chemicalss Derivatives Company RSC Ltd) महत्त्वाकंक्षी करार केला आहे. रसायन निर्मितीच्या क्षेत्रातील (Chemicals) हा करार तब्बल 200 कोटी डॉलरचा ($2 billion) असून रसायनांच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण होण्याकडे टाकलेलं हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे. भारत आणि युएई यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक महत्त्वाकांक्षी पाऊल असल्याची प्रतिक्रिया रिलायनस् इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी दिली आहे.

काय आहे करार?

भारतात आणि जगभर सर्वाधिक मागणी असलेल्या रसायनांच्या निर्मितीबाबतचा हा करार आहे. या प्रकल्पांतर्गत Chlor-Alkali, Ethylene Dichloride आणि Polyvinyl Chloride या रसायनांची निर्मिती केली जाणार आहे. भारतात या रसायनांची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. त्यासाठी भारत सरकारच्या तिजोरीतून परकीय चलन खर्च होतं. मात्र आता देशांतर्गत कंपनीकडूनच या रसायनांचं उत्पादन केलं जाणार असल्यामुळे भारताचा या वस्तूंवर होणारा खर्च वाचणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

रोजगारवाढीला प्राधान्य

या करारामुळे भारत आणि युएई या दोन्ही देशांत रोजगार वाढीला चालना मिळणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्तानं मोठी गुंतवणूक बाजारात येणार असून हजारो तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहेत. TA’ZIZ इंडस्ट्रियल केमिकल झोन हा अबुधाबी नॅशनल ऑईल कंपनी आणि ADQ यांच्यातील संयुक्त प्रकल्प असणार आहे.

डोमेस्टिक सप्लाय चेनला फायदा

या प्रकल्पाची आखणी करताना दोन्ही देशातील मागणी आणि पुरवठ्याचं गणित, जागतिक बाजारपेठ आणि विविध माध्यमातून येणारी गुंतवणूक या बाबींचा विचार करण्यात आला असून जागतिक स्तरावर नवा प्रयोग यशस्वी होण्यासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया युएईचे उद्योगमंत्री डॉ. सुलतान अहमद अल जाबेर यांनी दिली आहे.

First published:

Tags: Mukesh ambani, Reliance Industries Limited