जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Petrol Diesel Prices Today: आज मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधन दरात काय बदल? तपासा नवे रेट

Petrol Diesel Prices Today: आज मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधन दरात काय बदल? तपासा नवे रेट

Petrol Diesel Prices Today: आज मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधन दरात काय बदल? तपासा नवे रेट

क्रूड ऑइलचा दर वाढता असला, तरी देशात पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Prices) दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढ असतानाही सरकारी तेल कंपन्या निवडणुकांच्या दबावामुळे दर वाढवू शकत नाहीत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 1 मार्च : सरकारी तेल कंपन्यांनी आज मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी यूपी, बिहारसह अनेक राज्यांच्या राजधानीमध्ये पेट्रोल-डिझेल दरात (Petrol Diesel Price Today) बदल केले आहेत. परंतु मुंबई, दिल्लीसारख्या मेट्रो शहरांत आजही पेट्रोल-डिझेल दर स्थिर आहे. मागील जवळपास चार महिन्यांपासून इंधन दरात बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल दर सर्वाधिक आहे. पेट्रोल 110 रुपयांजवळपास आहे. लखनऊमध्ये पेट्रोल 8 पैशांनी स्वस्त झालं आहे. तर पटनामध्ये 58 पैसे प्रति लीटर महागलं आहे. कंपन्यांकडून काही शहरांत दर बदलले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचा दर सात वर्षांच्या सर्वोच्च स्तरावर आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाची शक्यता पाहता क्रूड ऑइलमध्ये सतत तेजी आहे. ब्रेंट क्रूड 95 डॉलर प्रति बॅरल जवळपास ट्रेड करत आहे. क्रूड ऑइलचा दर वाढता असला, तरी देशात पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Prices) दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढ असतानाही सरकारी तेल कंपन्या निवडणुकांच्या दबावामुळे दर वाढवू शकत नाहीत.

हे वाचा -  महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका! कमर्शियल LPG Gas Cylinder च्या दरात मोठी वाढ

असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

हे वाचा -  Amul Milk Price Hike: अमूल दूध महागलं; उद्यापासून किती रुपये जास्त द्यावे लागणार

देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

पुणे109.45 रुपये92.25 रुपये
मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
नाशिक109.49 रुपये92.29 रुपये
नागपूर109.71 रुपये92.53 रुपये
अहमदनगर110.15 रुपये92.92 रुपये
औरंगाबाद110.38 रुपये93.14 रुपये
रत्नागिरी110.97 रुपये93.68 रुपये
रायगड109.48 रुपये92.25 रुपये
परभणी112.49 रुपये95.17 रुपये
पालघर109.75 रुपये92.51 रुपये
सांगली110.03 रुपये92.83 रुपये
कोल्हापूर110.09 रुपये92.89 रुपये

चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर - – दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर – मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर – चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात