नवी दिल्ली, 1 मार्च : सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी मार्च महिन्यासाठी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती जारी केल्या आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी विना सब्सिडीवाल्या 14 किलोग्रॅम सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली नाही. तेल कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइलने 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत 105 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर नवी दिल्लीत 19 किलोग्रॅम गॅस सिलेंडरचा नवा दर 2012 रुपये झाला आहे. नव्या किमती 1 मार्च 2022 पासून लागू होणार आहेत. 5 किलो सिलेंडरचा दर 27 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे दिल्लीत 5 किलो सिलेंडरचा दर 569 रुपये झाला आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. भारतात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एलपीजी सिलेंडरच्या किमती दर महिन्याला ठरवल्या जातात. मागील महिन्यात फेब्रुवारी 2022 मध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 91.50 रुपयांची कपात झाली होती. मात्र या महिन्यात तब्बल 105 रुपयांची वाढ झाली. या महिन्यात घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झालेली नाही. मागील महिन्यातही घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल करण्यात आले नव्हते.
हे वाचा - Amul Milk Price Hike: अमूल दूध महागलं; उद्यापासून किती रुपये जास्त द्यावे लागणार
19 किलोग्रॅम गॅस सिलेंडरचा नवा दर - दिल्लीत 19 किलोग्रॅम गॅसच्या किंमती 105 रुपयांनी वाढून 2012 रुपये झाल्या आहेत. याआधी दर 1907 रुपये होता. मुंबईत कमर्शियल गॅसचा दर 1963 रुपये झाला आहे. आधी हा दर 1857 रुपये होता. मुंबईत 106 रुपयांची वाढ झाली आहे. 14 किलोग्रॅम सिलेंडरचा दर - दिल्लीत विना सब्सिडी 14.2 किलोग्रॅम सिलेंडरचा दर 899.50 रुपये आहे. मुंबईतही घरगुती गॅसचा दर 899.50 रुपये आहे.
हे वाचा - New Rule:Ration Card धारकांना दिलासा,दुकानदारांकडून होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा
इथे तपासा LPG Gas Cylinder चा दर - घरगुती गॅस सिलेंडरचा दर तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर जावं लागेल. इथे कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करते. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर तुम्ही शहरातील सिलेंडरचा दर तपासू शकता.