मुंबई, 28 फेब्रुवारी : महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांचा आणखी एक झटका बसला आहे. अमूल दूध खरेदी करणे आता महाग (Amul Milk Price Hike) होणार आहे. कंपनीने देशभरात दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. ताज्या दरांनुसार, 1 मार्चपासून गुजरातमधील अहमदाबाद आणि सौराष्ट्र बाजारपेठेत अमूल गोल्ड (Amul Gold) 30 रुपये प्रति 500 मिली, अमूल ताझा (Amul Taza) 24 रुपये प्रति 500 मिली आणि अमूल शक्ती (Amul Shakti) 27 रुपये प्रति 500 मिली असेल. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दुधाच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी गेल्या वर्षी जुलैमध्ये दुधाचे दर वाढवण्यात आले होते. अमूल दुधाच्या सर्व ब्रँडवर ही दरवाढ लागू होणार आहे. यामध्ये टी-स्पेशल, सोना, ताझा, शक्ती याशिवाय गाय आणि म्हशीचे दूध इत्यादींचा समावेश आहे. तब्बल 7 महिने 27 दिवसांनी दरात वाढ करण्यात आली आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ हेच किमती वाढण्याचे कारण असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. Personal Loan मुदतीआधी बंद करायचं आहे का? किती दंड लागतो आणि क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होतो? चेक करा जीसीएमएमएफने सांगितले की, उत्पादन खर्चात झालेली वाढ हे भाव वाढण्याचे कारण आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पॅकेजिंग, वाहतूक आणि जनावरांच्या चाऱ्याच्या किमतीत वाढ झाल्याने दुधाच्या किमतीत वाढ झाली आहे. वाढलेल्या किमती 1 मार्च 2022 पासून लागू होतील. Future Group च्या शेअर्समध्ये 19 टक्क्यांपर्यंत वाढ; Reliance ने 200 स्टोअर ताब्यात घेतल्याचा फायदा अमूलने शेतकऱ्यांचे दूध खरेदी दर 35 रुपयांवरून 40 रुपये प्रति किलो फॅटवर वाढवले आहेत, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचे म्हणणे आहे की अमूल दुधाच्या खरेदीवर भरलेल्या प्रत्येक रुपयापैकी सुमारे 80 पैसे शेतकऱ्यांना परत केले जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.