Home /News /money /

Petrol Diesel Prices Today: इथे तपासा मुंबई-पुण्यातील आजचा पेट्रोल-डिझेल भाव

Petrol Diesel Prices Today: इथे तपासा मुंबई-पुण्यातील आजचा पेट्रोल-डिझेल भाव

4 नोव्हेंबर 2021 पासून इंधन दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. आजही (Petrol Diesel Price Today, 28 January 2022) इंधन दर स्थिर आहे.

    नवी दिल्ली, 28 जानेवारी : सरकारकडून पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपये प्रति लीटरने कमी केल्याने अनेक शहरांत पेट्रोल दर कमी झाला. 4 नोव्हेंबर 2021 पासून इंधन दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. आजही (Petrol Diesel Price Today, 28 January 2022)  इंधन दर स्थिर आहे. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते. इंधन दर वाढत नसले, तरी कमीदेखील होत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांना इंधनासाठी मोठी किंमत भरावी लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) सतत चढ-उतार होत आहेत. त्याचाच परिणाम किमतींवर पाहायला मिळतो आहे.

    हे वाचा - पहिल्यांदा Credit Card घ्यायचा विचार करताय? 'या' 5 क्रेडिट कार्डच्या ऑफर चेक करा

    महाराष्ट्रातील दर (Today's Petrol and Diesel Prices in Maharashtra)-
    पुणे109.45 रुपये92.25 रुपये
    मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
    नाशिक109.49 रुपये92.29 रुपये
    नागपूर109.71 रुपये92.53 रुपये
    अहमदनगर110.15 रुपये92.92 रुपये
    औरंगाबाद110.38 रुपये93.14 रुपये
    रत्नागिरी110.97 रुपये93.68 रुपये
    रायगड109.48 रुपये92.25 रुपये
    परभणी112.49 रुपये95.17 रुपये
    पालघर109.75 रुपये92.51 रुपये
    सांगली110.03 रुपये92.83 रुपये
    कोल्हापूर110.09 रुपये92.89 रुपये

    हे वाचा - Air India 69 वर्षांनंतर अधिकृतपणे Tata Group कडे, पुढील प्लानिंग कसं असणार?

    असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या